सैफ अली खान आणि करीना कपूरच्या छोट्या मुलाचं नाव आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:28 PM2021-07-09T14:28:43+5:302021-07-09T14:29:20+5:30

अभिनेत्री करीना कपूरने २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी छोट्या मुलाला जन्म दिला. तेव्हापासून बाळाचे नाव काय ठेवलंय हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

The name of Saif Ali Khan and Kareena Kapoor's youngest son came to the fore | सैफ अली खान आणि करीना कपूरच्या छोट्या मुलाचं नाव आलं समोर

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या छोट्या मुलाचं नाव आलं समोर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा छोटा मुलाचे नाव काय ठेवले हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचे चाहते त्याचे नाव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पाच महिन्यांपासून त्याच्या नावाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र आता पहिल्यांदा छोट्या नवाबचे नाव समोर आले आहे. 


अभिनेत्री करीना कपूरने २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी छोट्या मुलाला जन्म दिला होता. खान आणि कपूर कुटुंबाने पहिल्या दिवसांपासून बाळाच्या नावाबाबत मौन बाळगले आहे. याउलट तैमूरच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर त्याचे नाव समोर आले होते. त्यावेळी खूप वाद झाले होते. मात्र आता छोट्या मुलाच्या नाव पहिल्यांदाच समोर आले आहे. 


बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सैफ अली खान आपल्या छोट्या मुलाला जेह या नावाने संबोधतात. असे सांगितले जात आहे की हे बाळाचे निकनेम आहे. अद्याप बाळाचे बारसा झालाच नाही. खान आणि कपूर कुटुंबात आताही बाळाच्या नावावर चर्चा होते आहे. सैफ अली खानला जेव्हा बॉम्बे टाइम्सने बाळाच्या नावासाठी संपर्क केला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.


बाळाचे नाव सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी यांच्या नावावर मंसूर ठेवण्याचाही सध्या विचार सुरू आहे. ते पटौदीचे नवाब आणि प्रसिद्ध क्रिकेटर होते.


२०१६ साली २० डिसेंबरला सैफ आणि करीना पहिले बाळ तैमूर अली खानचे पालक झाले होते. तैमूरला घरात प्रेमाने टिम असे संबोधतात. याच वर्षी २१ फेब्रुवारीला दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. छोट्या बाळाच्या जन्मानंतर करीना आणि सैफ मोठ्या घरात शिफ्ट झाले. त्यांचे हे नवीन घर त्यांच्या जुन्या बंगल्याच्या जवळच आहे.

Web Title: The name of Saif Ali Khan and Kareena Kapoor's youngest son came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.