Manisha Koirala Birthday: नानांच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली होती मनीषा कोईराला, पण ‘त्या’ दिवशी सगळंच संपलं...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 03:19 PM2022-08-16T15:19:24+5:302022-08-16T15:21:25+5:30
Manisha Koirala Birthday: 80 व 90 च्या दशकात मनीषा कोईराला एक मोठी अभिनेत्री होती. साहजिकच ती शिंकली तरी बातमी व्हावी, अशी परिस्थिती होती. अशात मनीषाच्या लव्ह अफेअरच्या बातम्या चांगल्याच गाजल्या होत्या...
Manisha Koirala Birthday: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. नाव जितकं मोठं, तितक्या चर्चा जास्त. 80 व 90 च्या दशकात मनीषा कोईराला (Manisha Koirala ) एक मोठी अभिनेत्री होती. साहजिकच ती शिंकली तरी बातमी व्हावी, अशी परिस्थिती होती. अशात मनीषाच्या लव्ह अफेअरच्या बातम्या चांगल्याच गाजल्या होत्या. होय, मराळमोळे अभिनेते नाना पाटेकर (Nnana Patekar ) व मनीषा कोईराला यांची लव्हस्टोरी एकेकाळी प्रचंड चर्चेत होती.
‘अग्निसाक्षी’ या चित्रपटात नाना पाटेकर व मनिषा कोईराला सोबत काम केलं होतं. असं म्हणतात की, याच चित्रपटाच्या दरम्यान नाना आणि मनिषा एकमेकांच्या प्रेमात पडले. अगदी हे नातं लग्नापर्यंत येऊन ठेपलं होतं. होय, तेव्हा दोघं लग्न करणार असल्याची चर्चाही जोरात होती. खरं तर नाना पाटेकर आधीच विवाहित होते. पण ते विवाहित आहे हे माहित असूनही मनीषा त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. नानाच्या बाबतीतही फार काही वेगळं नव्हतं. ते सुद्धा मनीषाबद्दल पझेसिव्ह झाले होते. इतके की, त्यांचा पझेसिव्ह स्वभाव मनीषासाठी त्रासदायक ठरत होता. पण तरीही मनीषा नानाला सोडायला तयार नव्हती. मग या नात्याचा अंत कसा झाला तर एका अभिनेत्रीमुळे.
होय, मनीषा नानांच्या प्रेमात वेडी झाली असतानाच नानांच्या आयुष्यात आयशा जुल्काची एन्ट्री झाली आणि यानंतर सगळं काही बिघडत गेलं.
नाना आणि आयशा यांनी 2003 साली ‘आंच’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील त्या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात काही इंटिमेट दृश्य देखील चित्रीत करण्यात आली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नाना व आयशा एकमेकांच्या जवळ आल्याचं म्हटलं जातं. मनीषाला याबद्दल काहीही खबर नव्हती. पण मीडियात नाना व आयशाच्या अफेअरच्या बातम्या चवीने चघळल्या जात होत्या. अर्थात मनीषाचा या बातम्यांपेक्षा नानांवर अधिक विश्वास होता. काहीही झालं तरी तिला नानासोबतच राहायचं होतं.
याचदरम्यान एकदा मनिषा नानाला भेटायला गेली. बघते काय तर, नानाच्या रूममध्ये आयशा होती. आयशाला पाहून मनिषाची तळपायाची आग मस्तकात गेली. मनिषा आयशावर ओरडा ओरडा करायला लागली. हे सगळं पाहून आयशा देखील चिडली. मनीषा व नाना या दोघांचंही जोरदार भांडण झालं. हळूहळू गोष्टी बिघडायला लागल्या आणि एक दिवस मनीषाने नानांसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले. अर्थात नाना व मनीषाने कधीही आपल्या अफेअर, ब्रेकअपची कबुली दिली नाही. दोघंही कधीच या नात्यावर बोलले नाही. पण आजही नाना व मनीषाच्या अफेअरचा उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा आयशा जुल्काचं नावही समोर येतं.
2010 मध्ये मनीषाने नेपाळी बिझनेसमॅन सम्राट दहलसोबत लग्न केले. अर्थात 2012 साली तिचा घटस्फोट झाला. सध्या मनीषा एकाकी आयुष्य जगतेय.