Nana Patekar यांना आजही येते Manisha Koirala ची आठवण, म्हणाले होते - मी माझे अश्रू...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:30 PM2023-02-08T14:30:51+5:302023-02-08T14:31:32+5:30

Nana Patekar and Manisha Koirala Love Story : मीडिया रिपोर्टमध्ये असं सांगितलं जातं की, अभिनेत्री मनीषा कोईराला आणि नाना पाटेकल यांची पहिली भेट 'अग्निसाक्षी' सिनेमाच्या सेटवर झाली होती.

Nana Patekar Manisha Koirala love story uncompleted Nana still miss actress her, know the details | Nana Patekar यांना आजही येते Manisha Koirala ची आठवण, म्हणाले होते - मी माझे अश्रू...

Nana Patekar यांना आजही येते Manisha Koirala ची आठवण, म्हणाले होते - मी माझे अश्रू...

googlenewsNext

Nana Patekar and Manisha Koirala Love Story : बॉलिवूडमधील लव्हस्टोरीज नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. 90 च्या दशकात नाना पाटेकल (Nana Patekar) आणि मनीषा कोईराला (Manisha Koirala) यांची प्रेम कहाणीही खूप चर्चेत होती. ऑनस्क्रीन रोमान्स करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या नशीबात एक होणं लिहिलेलं नव्हतं.

का झालं नाही नाना आणि मनीषाचं लग्न?

मीडिया रिपोर्टमध्ये असं सांगितलं जातं की, अभिनेत्री मनीषा कोईराला आणि नाना पाटेकल यांची पहिली भेट 'अग्निसाक्षी' सिनेमाच्या सेटवर झाली होती. हा सिनेमा 1996 मध्ये आला होता. तेव्हा मनीषा केवळ 27 वर्षांची होती आणि नाना पाटेकर साधारण 45 वर्षांचे होते. दोघांच्या वयात फार अंतर होतं. नाना पाटेकर हे त्यावेळी विवाहित आणि एका मुलाचे वडील होते. मनीषा आणि नाना एक न होण्याचं कारण हेच मानलं जातं. कारण त्यांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता.

अजूनही त्यांना येते मनीषाची आठवण...

मनीषा कोईरालासोबत नातं तुटल्यानंतरही नाना पाटेकल आपलं प्रेम विसरू शकले नाहीत. नाना पाटेकर यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते आजही मनीषाची आठवण काढतात. इतकंच नाही तर नाना यांनी मनीषाची तुलना हरणाच्या कस्तुरीसोबत केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, नाना तेव्हा म्हणाले होते की, 'तिला कुणासोबतही अॅडजस्टमेंट करण्याची गरज नाही. तिच्याकडे सगळं काही आहे'.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर (Nana Patekar Love Story) यांनी सांगितलं होतं की, 'मी आजही जेव्हा तिला बघतो की, ती काय करत आहे. तेव्हा फार अवघडपणे आपले अश्रू रोखतो. ब्रेकअपच्या नंतरचा काळ फार अवघड असतो..'.

Web Title: Nana Patekar Manisha Koirala love story uncompleted Nana still miss actress her, know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.