१५ वर्षांनी नाना पाटेकर अन् शाहिद कपूर एकत्र, सोबत तृप्ती डिमरी! नवीन सिनेमा कधी होणार रिलीज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:57 IST2024-12-18T12:56:11+5:302024-12-18T12:57:16+5:30
नाना पाटेकर यांच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमात बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते झळकणार आहेत

१५ वर्षांनी नाना पाटेकर अन् शाहिद कपूर एकत्र, सोबत तृप्ती डिमरी! नवीन सिनेमा कधी होणार रिलीज?
२०२४ वर्ष संपत आलंय. या वर्षाची सुरुवात बॉलिवूडमध्ये हृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमाने केली होती. तर २०२४ ची अखेर साउथच्या 'पुष्पा २' ने गाजवली. २०२४ च्या पुढील काही दिवसांमध्ये 'बेबी जॉन' आणि 'वनवास' हे दोन बॉलिवूड सिनेमे रिलीज होणार आहेत. नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाची ट्रेलरपासूनच प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता नानांच्या चाहत्यांसाठी आणखी एक बातमी म्हणजे नाना आणखी एका मल्टिस्टारर बॉलिवूड सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आलीय.
नानांच्या नवीन सिनेमा बॉलिवूडचे सुपरस्टार
साजिद नाडियादवाला यांच्या आगामी हिंदी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असून त्यांंच्यासोबत शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, रणदीप हूडा हे कलाकार झळकणार आहे. २०१० साली आलेल्या 'पाठशाला' सिनेमानंतर नाना पाटेकर - शाहिद कपूर तब्बल १५ वर्षांनी या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. पुढील वर्षी अर्थात ६ जानेवारी २०२५ पासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
कधी होणार हा सिनेमा रिलीज?
नाना पाटेकरांच्या या आगामी मल्टिस्टारर सिनेमाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज करणार आहेत. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. या आगामी हिंदी सिनेमाची रिलीज डेटही जाहीर झालीय. ५ डिसेंबर २०२५ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. नाना पाटेकर सध्या 'हाउसफुल्ल ५' सिनेमाचं शूटिंग करत आहेत. या सिनेमात ते अक्षय कुमार, श्रेयस तळपदे, अभिषेक बच्चनसोबत काम करणार आहेत. अशाप्रकारे पुन्हा एकदा नाना हिंदी मनोरंजन विश्वातील विविध विषयांवरील सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहेत.