नाना पाटेकरांचा 'वनवास' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी अन् कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:55 IST2025-03-10T18:54:17+5:302025-03-10T18:55:58+5:30

'वनवास' सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असून कोणत्या ओटीटीवर तुम्ही घरबसल्या बघाल, जाणून घ्या (vanvaas)

Nana Patekar Vanvaas movie OTT released updates details inside | नाना पाटेकरांचा 'वनवास' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी अन् कुठे बघाल?

नाना पाटेकरांचा 'वनवास' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी अन् कुठे बघाल?

नाना पाटेकरांचा (nana patekar) २०२४ च्या डिसेंबर महिन्यात आलेला 'वनवास' (vanvaas) सिनेमा प्रेक्षक आणि समीक्षकांना चांगलाच आवडला. या सिनेमाच्या माध्यमातून नाना पाटेकरांनी अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. बाप-मुलाच्या हळव्या नात्यावर आधारीत हा सिनेमा अनेकांना भावुक करुन गेला. नाना पाटेकर यांचा 'वनवास' थिएटरमध्ये ज्यांना पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी.  'वनवास' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

'वनवास'च्या ओटीटी रिलीजविषयी

'वनवास'च्या रिलीजनंतर तीन महिन्यांनी सिनेमाच्या ओटीटी रिलीजविषयी माहिती समोर येतेय. हा सिनेमा आता झी ५ या ओटीटीवर रिलीज होणार आहे. १४ मार्च २०२५ ला हा सिनेमा झी ५ या ओटीटीवर घरबसल्या बघायला मिळणार आहे. नुकतीच 'वनवास' सिनेमाच्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली. त्यामुळे ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना आता सहकुटुंब सहपरिवार सिनेमा घरबसल्या बघायची संधी मिळणार आहे.


'वनवास'विषयी सांगायचं तर...

नाना पाटेकरांच्या करिअरमधील आजवरचा वेगळा सिनेमा 'वनवास' सिनेमाकडे पाहिलं जात होतं. या सिनेमात नाना यांच्यासोबत अभिनेता उत्कर्ष शर्माही झळकला. 'गदर' आणि 'गदर २' या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'वनवास'चं दिग्दर्शन केलं होतं. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमीश्र प्रतिसाद मिळाला. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' त्याचदरम्यान रिलीज झाल्याने नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खऱ्या अर्थाने वनवास भोगावा लागला.

Web Title: Nana Patekar Vanvaas movie OTT released updates details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.