नाना पाटेकरांच्या 'वनवास'ला प्रेक्षक मिळेना! वीकेंडलाही कमाईत घट; तीन दिवसांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:21 IST2024-12-23T10:18:22+5:302024-12-23T10:21:55+5:30
नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाच्या कमाईत वाढ होताना काही दिसत नाहीये. तीन दिवसांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय (vanvas, nana patekar)

नाना पाटेकरांच्या 'वनवास'ला प्रेक्षक मिळेना! वीकेंडलाही कमाईत घट; तीन दिवसांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
नाना पाटेकरांची प्रमुख भूमिका असलेल्या 'वनवास' सिनेमा रिलीज झालाय. २० डिसेंबरला 'वनवास' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'वनवास' सिनेमाचे संमीश्र रिव्ह्यू समोर आले. असं वाटलं होतं की, अनेक महिन्यांनी प्रदर्शित झालेल्या नाना पाटेकरांचा 'वनवास' सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी होईल. परंतु असं काही झालेलं दिसलं नाही. 'वनवास' सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे. या सिनेमाने बजेटचा आकडाही अजून वसूल केला नाहीये. पाहूया सिनेमाची कमाई.
'वनवास' सिनेमाची तीन दिवसांची कमाई किती?
'वनवास' सिनेमाच्या कलेक्शनकडे नजर टाकली तर सिनेमाने पहिल्याच दिवशी अवघ्या ६० लाखांचं कलेक्शन केलं. दुसऱ्या दिवशी कमाईत आणखी घट झाली आणि सिनेमाने अवघ्या ५८.३३ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी कमाईत काहीशी वाढ झाली असून सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार सिनेमाने १.३० कोटींची कमाई केली. यामुळे 'वनवास'ची तीन दिवसांची कमाई २.८५ कोटी इतकी झालीय. वनवास सिनेमाचं बजेट ३० कोटी असून कमाईचे आकडे बघता अजूनतरी नाना पाटेकरांच्या या सिनेमाने बजेटचा आकडा ओलांडला नाहीये.
NANA PATEKAR - UTKARSH SHARMA: 'VANVAAS' TEASER IS HERE... 20 DEC RELEASE *CHRISTMAS*... Emotions are director #AnilSharma’s forte, as seen in films like #Shradhanjali, #Gadar, #Apne and #Gadar2… Looking forward to the emotional quotient he brings to #Vanvaas.
— taran adarsh (@taran_adarsh) October 29, 2024
Stars… pic.twitter.com/Jn3SwAkQo5
वनवास सिनेमाविषयी सांगायचं तर..
'वनवास' सिनेमाविषयी सांगायचं तर नाना पाटेकरांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. तर उत्कर्ष शर्माने या सिनेमात नानांसोबत भूमिका साकारली आहे. 'गदर' आणि 'गदर २' या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक अनिल शर्मांनी 'वनवास'चं दिग्दर्शन केलंय. वडील- मुलाच्या भावुक नात्याची हृदयस्पर्शी कहाणी 'वनवास' सिनेमात दिसतेय. सिनेमाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद दिसला तरी ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांना आवडलेला दिसतोय.