नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचा आरोप करणारी अभिनेत्री कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण, एका सिनेमासाठी तनुश्री आकारते इतके मानधन….
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 05:13 PM2018-10-06T17:13:09+5:302018-10-06T17:13:31+5:30
२००८ हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक गौप्यस्फोट तिने केला आहे. या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बी - टाऊनपासून सोशल मीडियापर्यंत दोन नावांची चर्चा सर्वात जास्त ऐकायला मिळत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि अभिनेता नाना पाटेकर. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू दाखवत रसिकांची मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने सनसनाटी आरोप केले. सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असलेल्या तनुश्रीने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे.
२००८ हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक गौप्यस्फोट तिने केला आहे. या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. नाना पाटेकर यांच्यावरील या आरोपानंतर तनुश्री चर्चेत आली आहे. तिने केलेल्या सिनेमांची जितकी चर्चा झाली नसेल तितकी चर्चा तिची होत आहे.
तिला बी- टाऊनमध्ये समर्थन देणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे. तनुश्रीने आजवर मोजकेच सिनेमा केले असले तरी ती कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. एका सिनेमात काम करण्यासाठी तनुश्री एक कोटी रुपये इतके गलेलठ्ठ मानधन घेते.
मॉडेलिंग आणि सिनेमा तिचं कमाईचं साधन असून यातून ती आपला उदरनिर्वाह चालवते. २००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर ती 'चॉकलेट', 'ढोल', 'रिस्क','स्पीड' अशा सिनेमातही झळकली. मात्र २०१० नंतर ती सिनेमांत दिसली नाही. आता नाना यांच्यावरील या आरोपानंतर तिला एखाद्या रिअॅलिटी शोची घसघशीत ऑफर मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकीलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मात्र नानाकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीने केला आहे. उलट आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप करत वकीलांची आपलीही टीम सज्ज असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. तनुश्रीच्या आरोपांवर नाना येत्या ८ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी ही कलाकार मंडळी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेमध्ये ते तनुश्रीने केलेल्या आरोपांची उत्तर देणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नाना पहिल्यांदाच या आरोपांविषयी जाहीरपणे आपली बाजू मांडणार आहेत.