नाना पाटेकरची एक्स गर्लफ्रेंड आयेशा जुल्का ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक !!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 01:16 PM2017-12-08T13:16:26+5:302017-12-08T18:52:57+5:30

हिंदी सिनेसृष्टीत आपला जलवा दाखविणारी अभिनेत्री आयेशा जुल्का बºयाच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. आमीर खान, अक्षयकुमारसारख्या अभिनेत्यांबरोबर काम ...

Nana Patekar's Ax Girlfriend 'Ayesha Julka' will make her film debut! | नाना पाटेकरची एक्स गर्लफ्रेंड आयेशा जुल्का ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक !!

नाना पाटेकरची एक्स गर्लफ्रेंड आयेशा जुल्का ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक !!

googlenewsNext
ंदी सिनेसृष्टीत आपला जलवा दाखविणारी अभिनेत्री आयेशा जुल्का बºयाच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. आमीर खान, अक्षयकुमारसारख्या अभिनेत्यांबरोबर काम करणारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी परतत आहे. वृत्तानुसार, ‘गदर’ या चित्रपटाचे निर्माते अनिल शर्माच्या नव्या प्रोजेक्टमध्ये आयेशा जुल्का झळकणार आहे. या चित्रपटात आयेशा मुख्य अभिनेत्री इशिता चौहानच्या आईची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयेशाने सांगितले की, ‘मला चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा नव्हती, परंतु अनिलजींनी मला एकत्र काम करण्यास विनंती केली.’ आपल्या भूमिकेविषयी बोलताना आयशाने सांगितले की, ‘माझी भूमिका एका परखड विचारांच्या महिलेची आहे, जी एका मुलीची आई आणि तिची चांगली मैत्रीण आहे.’

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आयेशा जुल्काने अभिनय सोडून बिझनेसकडे लक्ष दिले. दरम्यान, जेव्हा ती बॉलिवूडमध्ये सक्रिय होती, तेव्हा अक्षयकुमारसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. याचदरम्यान आयेशाचे नाव नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतही जोडले गेले. आयेशाने तिच्या प्रत्येक चित्रपटात क्लीन इमेज ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु २००३ साली नाना पाटेकरसोबत ‘आंच’ या चित्रपटात तिने बोल्ड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. वृत्तानुसार आयेशा जुल्का आणि नाना पाटेकर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. परंतु नानाकडून वाईट वागणूक मिळू लागल्याने तिने नानासोबतचे नाते तोडले होते. 



त्यानंतर आयेशा मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा रंगली होती. आयेशाने तिच्या वयापेक्षा २२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मिथुन चक्रवर्तीसोबत ‘दलाल’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातही तिने बोल्ड सीन दिले होते. त्याकाळी तिच्या या बोल्ड सीनमुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, बोल्डनेसचे हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणानंतर आयेशाचे संपूर्ण करिअरच संपले होते. पुढे आयशाने २००३ साली कन्स्ट्रक्शन टायकून समीर वाशी यांच्याशी लग्न केले. आता पतीसोबत कन्स्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:च्या क्लोदिंग लाइनचा बिझनेस सांभाळत आहे. असो, आता पुन्हा एकदा आयेशा पडद्यावर परतणार असून, तिला बघणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल यात शंका नाही. 

Web Title: Nana Patekar's Ax Girlfriend 'Ayesha Julka' will make her film debut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.