"स्मशानात लागणारी लाकडं मी गोळा करुन ठेवलीत…", नाना पाटेकर यांचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 04:00 PM2023-09-16T16:00:09+5:302023-09-16T16:00:50+5:30
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर लवकरच एका नव्या प्रोजेक्टसह रुपेरी पडद्यावर परतत आहेत. ते विवेक अग्निहोत्रीच्या 'द वॅक्सीन वॉर' या चित्रपटात दिसणार आहेत.
अभिनेते नाना पाटेकर लवकरच एका नव्या प्रोजेक्टसह रुपेरी पडद्यावर परतत आहेत. ते विवेक अग्निहोत्रीच्या 'द वॅक्सीन वॉर' या चित्रपटात दिसणार आहेत. २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या ते या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. मोकळेपणाने आणि निर्भीडपणे बोलणारे नाना मीडियाच्या मुलाखतीत मनापासून बोलले. बॉलिवूड असो की आयुष्य, प्रत्येक प्रश्नाला त्यांनी बिनधास्त उत्तरे दिली.
वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत कार्यरत असलेले नाना आजही आपल्या मुळाशी जोडलेले आहेत. त्यांच्यात बनावटपणा नाही. शोबाजी करण्यावर त्यांचा विश्वास नाही. साधे जीवन जगा आणि तुमच्या तत्त्वांचे पालन करा. नाना म्हणतात की त्यांना जीवनाचे वास्तव समजले आहे. ते कोणत्याही गैरसमजात राहत नाही आणि इतरांनीही गैरसमजात राहू नये.
माझा मृत्यूवर विश्वास आहे आणि...
नाना म्हणाले की, माझा मृत्यूवर विश्वास आहे. मला १२ मण लाकूड मिळणार आहे, ही माझी अंतिम मालमत्ता आहे. मी यासह निघून जाईन. मी माझे १२ मण लाकूड विकत घेतले आहेत. ते कोरडे आहेत, मला त्यातच जाळून टाका, ओले लाकूड वापरू नका, नाहीतर धूर येईल, जे मित्र जमतील त्यांच्या डोळ्यात धूर येईल, मग त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. अशा परिस्थितीत मरताना गैरसमज होईल की ते माझ्यासाठी रडत आहेत.
माझे सर्वजण दुसऱ्या जगात आहेत...
निदान मरताना तरी गैरसमज होता कामा नये. तू उद्या मरशील आणि २-४ दिवसांनी तुला कोणीही आठवणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की माझे फोटो पोस्ट करू नका. ते पूर्णपणे विसरा, हे खूप महत्वाचे आहे. आम्ही ७ भाऊ बहिणी होतो. ते सर्व निघून गेले आणि मी एकटाच राहिलो. आई-वडील नाहीत, भाऊ-बहीण नाहीत, त्यामुळे आता मी या जगाचा नाही. माझे सर्वजण दुसऱ्या जगात आहेत, असे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं केलं कौतुक
मुलाखतीत नाना पाटेकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणालेे की, मला त्यांचे काम खूप आवडते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री यांच्यासोबत माझी अहमदाबादमध्ये भेट झाली. आम्ही बराच वेळ बोललो. आता ते खूप व्यस्त आहेत. काही काळापूर्वी मी 'नाम' फाऊंडेशनच्या कामासाठी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यांनी माझे म्हणणे ऐकून एका व्यक्तीला बोलावून संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करण्यास सांगितले होते. संध्याकाळपर्यंत माझे काम झाले होते. मला इथल्या कोणत्याही नेत्याचा कधीच त्रास झाला नाही.