काय ‘मंटो’चे बॉक्सआॅफिस कलेक्शन पाहून निराश आहेत नंदिता दास??

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 01:21 PM2018-09-26T13:21:33+5:302018-09-26T13:24:52+5:30

होय, पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४५ लाखांचे कलेक्शन केले आणि यानंतरच्या शनिवारी व रविवारी केवळ दीड कोटी कमावले. ही कमाई पाहून नंदिता दास यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. मीडियाला एक खुले पत्र लिहून ही नाराजी त्यांनी बोलून दाखवली. 

nandita das is angry with the box office collection of manto | काय ‘मंटो’चे बॉक्सआॅफिस कलेक्शन पाहून निराश आहेत नंदिता दास??

काय ‘मंटो’चे बॉक्सआॅफिस कलेक्शन पाहून निराश आहेत नंदिता दास??

googlenewsNext

मंटो’ या चित्रपटाची जगभरातील चित्रपट महोत्सवात प्रशंसा झाली. गत शुक्रवारी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. पण तांत्रिक अडचणींमुळे चित्रपटाचा पहिलाच मॉर्निंग शो रद्द झाला. ‘मंटो’च्या दिग्दर्शिका नंदिता दास यांनी यावर नाराजीही बोलून दाखवली. वितरण आणि चित्रपटाचे प्रसारण करणाऱ्या कंपनीत कागदोपत्री औपचारिकता पूर्ण न झाल्याने असे झाल्याचे म्हटले गेले. अर्थात संध्याकाळपर्यंत सगळे गैरसमज मिटले आणि ‘मंटो’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. पण पहिल्याच दिवशीच्या जोरदार धक्क्याने बॉक्सआॅफिसवरील ‘मंटो’बद्दलच्या अपेक्षा संपुष्टात आल्यात.

 होय, पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४५ लाखांचे कलेक्शन केले आणि यानंतरच्या शनिवारी व रविवारी केवळ दीड कोटी कमावले. ही कमाई पाहून नंदिता दास यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. मीडियाला एक खुले पत्र लिहून ही नाराजी त्यांनी बोलून दाखवली. आपल्या या पत्रात चित्रपटसृष्टीतील लोकांच्या मानसिकतेवर त्यांनी भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी लिहिले की, बॉलिवूडचे पूर्वग्रहदूषित वितरक आणि चित्रपटगृहांचे मालक एका चांगल्या चित्रपटाबद्दलच्या बॉक्सआॅफिसवरच्या कमाईच्या सर्व शक्यता संपुष्टात आणतात. ‘मंटो’ त्याचे ताजे उदाहरण आहे. बॉलिवूड बॅनरच्या अतिशय सुमार चित्रपटालाही २००० स्क्रिन्स मिळतात आणि ‘मंटो’ सारख्या चित्रपटाला कशाबशा ५०० स्क्रिन्स दिल्या जातात. अमूक चित्रपट प्रेक्षकांसाठी आहे, तमूक चित्रपट प्रेक्षक समजू शकणार नाहीत, हे बॉलिवूडचे लोक आधीच ठरवून टाकतात. प्रत्येक चित्रपटावर आपले लेबल चिकटवतात. अनेक चित्रपट महोत्सवात ‘मंटो’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भारतातील लोक हा चित्रपट पाहायला उत्सूक होते. गुगल ट्रेंडवरून ही गोष्ट स्पष्ट झाली होती. पण असे असताना वितरकांनी अमृतसर, श्रीनगर सारख्या शहरात हा चित्रपट रिलीज केला नाही. जिथे कुठे रिलीज झाला, तिथे एकतर अगदी सकाळची किंवा रात्री उशीराचा टाईम स्लॉट दिला गेला. अशास्थितीत ‘मंटो’ पाहण्याची इच्छा असूनही अनेकजण तो पाहू शकले नाहीत. मसाला चित्रपटापेक्षा काही वेगळे बनवणा-या दिग्दर्शकांसाठी ही निराशाजनक स्थिती आहे. तुमच्याकडे वितरण वा मार्केटींग सिस्टिम नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. माझ्यासाठी ही हतबल करणारी स्थिती आहे. आज चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यात अनेक ‘दलाल’ आले आहेत. कुणी कुठला चित्रपट बघावा, कुठला बघू नये, हे हेच ‘दलाल’ ठरवतात़. आम्हाला चित्रपट हिट करण्याचे सगळे फॉम्युले माहित आहेत, असा दावा काही लोक करतात. पण चित्रपट ही कला आहे आणि कलाचं राहिल, असेही नंदिता यांनी म्हटले आहे.

Web Title: nandita das is angry with the box office collection of manto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.