रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:07 IST2023-07-26T15:04:39+5:302023-07-26T15:07:11+5:30
Nargis dutt:संजय दत्त आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे नर्गिस प्रचंड संतापल्या होत्या.

रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना भूरळ पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा (Rekha). आजवरच्या कारकिर्दीत रेखाचे अनेक सिनेमा गाजले. पण, फिल्मी करिअरपेक्षा तिच्या अफेअर्सची सर्वाधिक चर्चा रंगली. रेखाचं नाव अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. यात अभिनेता संजय दत्तचाही (sanjay dutt) समावेश आहे. मात्र, संजय आणि रेखाच्या अफेअर्सविषयी समजल्यानंतर अभिनेत्री नर्गिस (nargis) यांनी रेखावर कठोर शब्दांत टीका केली होती.
रेखा आणि संजय यांनी १९८४ मध्ये 'जमीन आसमान' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. यावेळी रेखा प्रचंड लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री होती. तर, संजय स्ट्रगल करत होता. विशेष म्हणजे असं असतानाही संजय-रेखा एकमेकांना डेट करत असून त्यांनी पळून जाऊन लग्न केल्याच्या चर्चांनी मोठा जोर धरला होता. ही गोष्ट दत्त कुटुंबियांच्या कानावर पडल्यानंतर नर्सिग प्रचंड संतापल्या होत्या.
रेखा आणि संजयने एका मंदिरात लग्न केल्याचं म्हटलं जात होतं. ही गोष्ट सुनील दत्त यांना कळल्यानंतर त्यांनी रेखा आणि संजयशी चर्चा केली. तसंच अनावश्यक गोष्टींमध्ये अडकू नकोस, असा सल्ला संजयला दिला. तर, नर्गिस यांनी तर रेखावर आगपाखड केली. तिला नको नको ते बोलल्या.
काय म्हणाल्या होत्या नर्गिस?
'रेखा म्हणजे पुरुषांना स्वत:च्या जाळ्यात ओढणारी एक बाई आहे. ती पुरुषांना तसेच इशारे (सिग्नल देते) करते', असं नर्गिस म्हणाल्या होत्या. एवढंच नाही तर ती चेटकीण आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या.