"२० वर्षांपासून संपर्कातच नाही...", नर्गिस फाखरीचा खुलासा, बहिणीवर लागलेल्या आरोपांमुळे बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 09:23 AM2024-12-04T09:23:39+5:302024-12-04T09:24:24+5:30
बहिणीवर लागलेल्या आरोपांनंतर नर्गिस फाखरीची पहिली प्रतिक्रिया
'रॉकस्टार' फेम अभिनेत्री नर्गिस फाखरीची (Nargis Fakhri) बहीण आलिया फाखरीवर अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आहे. एक्स बॉयफ्रेंडला त्याच्या प्रेयसीसोबत जीवंत जाळल्याचा तिच्यावर आरोप आहे. यामुळे नर्गिस फाखरीही बऱ्याच काळानंतर चर्चेत आली आहे. दरम्यान अभिनेत्रीने बहिणीवरील या आरोपांवर शॉकिंग प्रतिक्रिया दिली आहे. २० वर्षांपासून बहिणीच्या संपर्कातच नसल्याचं ती म्हणाली.
न्यूज रिपोर्ट्नुसार, ४३ वर्षीय आलिया फाखरीने तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याची प्रेयसी जिथ होते त्या गॅरेजला आग लावली. यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आलिया फाखरीला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान नर्गिसच्या एका निकटवर्तियाने यावर स्पष्टीकरण देत सांगितले की "अभिनेत्री २० वर्षांपासून तिच्या बहिणीच्या संपर्कात नाही. सगळ्यांप्रमाणेच नर्गिसलाही बातम्यांमधूनच हे समजलं. यामुळे नर्गिसला याबाबतीत काहीच माहिती नसणं साहजिक आहे."
आगीच्या घटनेत ३५ वर्षीय एडवर्ड जॅकब्स आणि ३३ वर्षीय अनास्तासिया यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी सांगितले की, आम्हाला काहीतरी जळण्याचा वास येत होता. नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही बाहेर गेलो तेव्हा बाजूच्या गॅरेजला आग लागली होती. आलिया कायम तुझं घर जाळून टाकणार, तुला मारणार असं तिच्या बॉयफ्रेंडला बोलायची असं काही लोकांनी म्हटलं.
नर्गिस फाखरीची बहीण आलिया आणि मृत एडवर्ड हे दोघे १ वर्षापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. एडवर्डच्या आईने सांगितले की, दोघे एक वर्षापूर्वी वेगळे झालेत. आलिया त्या गोष्टीला स्वीकारायला तयार नव्हती. सूडबुद्धीने आलियाने एडवर्ड आणि त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळले असा आरोप आईने केला. या प्रकरणी पोलिसांनी आलियाला अटक केली असून अद्याप कोर्टाने तिला जामीन दिला नाही.