एका अपघाताने बदलले होते नर्गिस यांचं आयुष्य, राज कपूर यांना सोडून सुनील दत्त यांच्याशी केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 07:00 AM2021-04-03T07:00:00+5:302021-04-03T07:00:01+5:30
राज कपूर आणि नर्गीस दत्त यांची लव्हस्टोरी फारच गाजली होती.
बॉलिवूडच्या सर्वात सुपरहिट जोड्यांमध्ये राज कपूर आणि नर्गिस दत्त यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. या दोघांच्या सिनेमातील लव्हस्टोरी सोबतच रिअल लाईफमधील लव्ह स्टोरीही चांगलीच गाजली. पण या दोघांची लव्हस्टोरी पूर्ण का होऊ शकली नाही. त्यांच्यात असं काय झालं की, त्यांना वेगळं व्हावं लागलं चला जाणून घेऊया.... राज कपूर आणि नर्गिस दत्त यांची लव्हस्टोरी फारच गाजली. अनेकांनी यावर खूपकाही लिहिलं आहे. नर्गिस दत्त यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून 1942 मध्ये तमन्ना या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले.
या दोघांची पहिली भेटही एखाद्या फिल्मी सीनसारखीच झाली होती. असे म्हणतात की, कामानिमित्त एकदा राज कपूर नर्गिस दत्त यांच्या आई जद्दन बाईकडे गेले होते. त्यावेळी त्या घरी नव्हत्या, नर्गिस तेव्हा एकट्याच घरी होत्या आणि भजी तळत होत्या. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या हाताला बेसन लागले होते. त्यांच्या चेहऱ्यावरही बेसन लागलं होतं. त्यावेळीच नर्गिस यांची सुंदरता राज कपूर प्रेमात पडले.
आवारा सिनेमातील एका गाण्याच्या शूटसाठी राज कपूर यांनी 8 लाख रुपये खर्च केले होते. तर सिनेमाचं बजेट 12 लाख रुपये होतं. पूर्ण बजेट ओव्हरबजेट झालं. त्यामुळे नर्गिस यांनी आपले दागिने विकून राज कपूर यांना मदत केली होती.
राज कपूर गे नर्गिस यांना भेटण्याआधीच विवाहित होते. त्यामुळे त्यांनी नर्गिस यांच्याशी लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नर्गिस हे कळल्यावर त्या दु:खी झाल्या होत्या. राज कपूर हे कधीही त्यांच्यासोबत लग्न करणार नाही. तेव्हा त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. यानंतर सुनील दत्त त्यांच्या आयुष्यात आले. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्यात खूप चांगली मैत्री होती. पहिल्यात नजरेत सुनील दत्त नर्गिस यांच्या प्रेमात पडले होते. मात्र त्यांनी ही गोष्ट कधीच नर्गिस यांना सांगितली नाही.
१९५७ साली साली सुनील दत्त व नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ या सिनेमात एकत्र काम केले. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. याच सिनेमाच्या सेटवर सुनील दत्त यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचे प्राण वाचवले आणि त्यांच्यातील लव्हस्टोरी बहरायला लागली. त्यानंतर वर्षभरातच दोघांनी लग्न केले.