Taj Divided by blood : नसीरुद्दीन शाह म्हणाले, 'बरं झालं तुझ्यासोबत रोमॅंटिक सीन नाही'; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:08 AM2023-02-28T11:08:43+5:302023-02-28T11:13:10+5:30

संध्या मृदुल हिने सिरीजमध्ये जोधा तर नसीरुद्दीन शाह यांनी अकबरची भूमिका साकारली आहे.

Naseeruddin Shah says to co actor sandhya mrudul that thank god there is no romantic scene with you | Taj Divided by blood : नसीरुद्दीन शाह म्हणाले, 'बरं झालं तुझ्यासोबत रोमॅंटिक सीन नाही'; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

Taj Divided by blood : नसीरुद्दीन शाह म्हणाले, 'बरं झालं तुझ्यासोबत रोमॅंटिक सीन नाही'; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

googlenewsNext

Taj Divided by blood : 'साथिया' फेम अभिनेत्री संध्या मृदुल (Sandhya Mrudul) आगामी 'ताज : डिव्हायडेड बाय ब्लड' या सिरीजमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिने जोधाबाईची भूमिका साकारली आहे तर अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) अकबरच्या भूमिकेत आहेत. जोधा अकबरची प्रेमकहाणी देखील सिरीजचा महत्वाचा भाग आहे. दरम्यान नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर रोमॅंटिक सीन कसा शूट केला या प्रश्नावर संध्या मृदुल हिने स्पष्टीकरण दिले आहे.

'ताज : डिव्हायडेड बाय ब्लड' या सिरीजचे चित्रीकरण करतानाचा अनुभव अभिनेत्री संध्या मृदुलने शेअर केला आहे. ती म्हणाली, 'सिरीजमध्ये जोधाबाई यांची दुसरी बाजू दाखवण्यात आली आहे. त्यांचं सलीम आणि अकबरसोबत वेगळं नातं होतं. त्या शांत, विनम्र आणि निडर आहेत. अकबर त्यांच्याकडून सल्ला घेतात आणि त्यांच्या मताचा आदरही करतात. त्यामुळे जोधाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.'

नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत स्क्रीन शेअर

नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम करताना काय अनुभव आला यावर संध्या म्हणाली, अकबर आणि जोधा यांच्यात चांगलं नातं होतं. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. असं नाही की त्यांच्यात इंटिमेट नातं होतं पण त्यांच्यातील समजुतदारपणा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सीन शूट करताना त्यांनी मला नेहमीच कंफर्टेबल केलं. ते माझ्यासोबत मजा मस्ती करायचे. ते गंमतीत म्हणायचे हे भगवान ही मुलगी खूप छोटी दिसते. बरं झालं माझे हिच्यासोबत रोमॅंटिंक सीन नाहीएत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमरही मस्त आहे.'

'ताज : डिवायडेड बाय ब्लड' ही सिरीज ३ मार्च रोजी zee5 या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. यामध्ये धर्मेंद्र, आदिती राव हैदरी, राहुल बोस यांचीही भूमिका आहे. 

Web Title: Naseeruddin Shah says to co actor sandhya mrudul that thank god there is no romantic scene with you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.