"प्रोपोगंडा सिनेमांशी लढण्याचा आता एकच उपाय..." नसीरुद्दीन शहांचा हल्लाबोल; म्हणाले, "आवाज..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:16 AM2023-05-30T11:16:59+5:302023-05-30T11:18:53+5:30
कट्ट्ररता, प्रोपोगंडा आणि दुष्प्रचार पसरवणाऱ्या सिनेमांशी लढण्याचा एकच उपाय आहे
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारे अभिनेते नसीरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) त्यांच्या विधानांमुळे आजकाल जास्त चर्चेत असतात. देशात चाललेल्या घडामोडी बघता ते खुलेपणाने आपलं मत मांडतात आणि टीकाही करतात. सध्या 'द केरळ स्टोरी' सिनेमाचा वाद सुरु आहे. ही एक प्रोपोगंडा फिल्म असल्याची टीका केली जातीए. दरम्यान प्रोपोगंडा सिनेमांशी लढण्याचा आता एकच उपाय आहे तो कोणता ते नसीरुद्दीन शहा यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' सिरीजच्या प्रमोशनदरम्यान नसीरुद्दीन शहा यांनी मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, "कट्ट्ररता, प्रोपोगंडा आणि दुष्प्रचार पसरवणाऱ्या सिनेमांशी लढण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे कलाकरांच्या माध्यमातून बोलायचं आणि बदल घडवून आणण्यासाठी आपल्या आवाज उठवायचा. मात्र अनेक लोक हे करायला तयार नाहीत ही एकमेव समस्या आहे."
गेल्या काही वर्षांपासून संवेदनशील मुद्द्यांवर बरेच सिनेमे बनत आहेत. काही लोक असे सिनेमे बघण्यासाठी सिनेमागृहात जात आहेत तर बरेच जण हे चित्रपट प्रोपोगंडा असल्याचं म्हणत आहेत. या सगळ्यावर चिंता व्यक्त करताना शहा म्हणाले, "हे प्रचार इस्लामोफोबिक आहेत आणि लोकांच्या माध्यमातून याची आलोचना केली जात आहे. जर तुम्हाला स्वतच:लाच पटत नसेल तर अशा चित्रपटांचा भाग होऊ नका. उत्तर देणं हे कलेचं काम नाही. यासाठी आवाज उठवणं, प्रश्न विचारणं गरजेचं आहे. न घाबरता याच्याशी लढता आलं पाहिजे."