हार्दिकशी घटस्फोट जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच भारतात परतली नताशा, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:43 AM2024-09-02T11:43:06+5:302024-09-02T11:43:50+5:30

नताशा आली पण मुलगा अगस्त्य कुठे?

Natasa Stankovic back in mumbai from serbia after announcing divorce with Hardik Pandya | हार्दिकशी घटस्फोट जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच भारतात परतली नताशा, शेअर केला फोटो

हार्दिकशी घटस्फोट जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच भारतात परतली नताशा, शेअर केला फोटो

हार्दिक पांड्याशी घटस्फोट जाहीर घेतल्यानंतर नताशा स्टँकोव्हिक (Natasa Stankovic) नुकतीच मुंबईत परतली आहे. १५ जुलै रोजी ती लेकासोबत सर्बियाला गेली होती.  तर १८ जुलैला तिने सोशल मीडिया पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला. यानंतर ती लेकासोबत सर्बियामध्ये वेळ घालवत होती. आता नुकतीच नताशा परत मुंबईत आली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने हे अपडेट दिलं आहे.

नताशा आज सोमवारी सकाळी ६ वाजता मुंबईत लँड झाली. तिने विमानतळावरचा फोटो शेअर केला आहे. यात तिने लेकाचा म्हणजेच अगस्त्यचा फोटो मात्र दाखवलेला नाही. त्यामुळे ती एकटीच मुंबईत आली आहे का अशीही एक शक्यता आहे. 'हॅलो मुंबई' असं कॅप्शन तिने फोटोला दिलं. मुंबईत येताच पाऊस पाहून तिने हे कॅप्शन दिलं.

नताशा स्टँन्कोव्हिक सर्बियाची आहे. ती डान्सर आणि अभिनेत्रीही आहे. २०१२ साली बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या उद्देशाने ती भारतात आली. तिने प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' सिनेमात भूमिका साकारली होती. बिग बॉस 8 मध्येही ती दिसली. एक महिना ती या घरात होती. नंतर नताशाने काही ब्रँड एडॉर्समेंट्स, कोलॅबोरेशन आणि सिनेमे केले. तिची एकूण संपत्ती 20 कोटी आहे.

Web Title: Natasa Stankovic back in mumbai from serbia after announcing divorce with Hardik Pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.