मुंबईत येताच नताशाने केले पहिले 'हे' काम, हार्दिकच्या वहिनीनं शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 09:02 IST2024-09-04T08:59:42+5:302024-09-04T09:02:23+5:30
क्रिकेटपटू कृणाल पंड्याची पत्नी आणि हार्दिकची वहिनी पंखुरीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे.

मुंबईत येताच नताशाने केले पहिले 'हे' काम, हार्दिकच्या वहिनीनं शेअर केला व्हिडीओ
Hardik Pandya Son Agastya : हार्दिक पंड्या आणि नताशा स्टँकोव्हिक (Natasa Stankovic) यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर नताशा मुलगा अगस्त्यसोबत तिच्या घरी सर्बिया गेली होती, मात्र पुन्हा एकदा ती मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच नताशाने हार्दिकचं घर गाठले आणि पंड्या कुटुंबाची आणि अगस्त्यची भेट घडवून दिली
नताशाने मुलगा अगस्त्याला वडील हार्दिकच्या घरी सोडलं आहे. हार्दिकची वहिनी आणि त्याचा मोठा भाऊ कुणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक गोंडस व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अगस्त्य त्याच्या चुलत भावांसोबत खेळताना दिसतोय. पंखुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवताना पाहायला मिळतेय.
हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर अगस्त्य हा आई नताशासोबत सर्बियामध्ये गेला होता. हार्दिक आणि नताशाचे मे 2020 मध्ये लग्न झाले. यानंतर दोघांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. आता लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. सध्या हार्दिक अमेरिकन गायिका जस्मिन वालियाला डेट करत असल्याच्या अफवा आहेत.