शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट झाली नताशा, पण आऊटफिटमुळे हार्दिकच्या Ex पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 09:41 AM2024-10-19T09:41:05+5:302024-10-19T09:43:21+5:30

एका इव्हेंटला नताशाने ग्लँमरस लूक करत हजेरी लावली होती. पण, तिच्या आऊटफिटमुळे मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

natasa stankovic looking stunning in black dress netizens compare her with urfi javed | शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट झाली नताशा, पण आऊटफिटमुळे हार्दिकच्या Ex पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट झाली नताशा, पण आऊटफिटमुळे हार्दिकच्या Ex पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविच घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर नताशाने पुन्हा तिच्या कामाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच नताशाचं अल्बम साँग प्रदर्शित झालं. त्यानंतर नुकतंच आता नताशाने एका इव्हेंटलाही हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील तिचा व्हिडिओ समोर आला आहे. 

नताशाचा इव्हेंटमधील एक व्हिडिओ विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या इव्हेंटला नताशाने ग्लँमरस लूक करत हजेरी लावली होती. पण, तिच्या आऊटफिटमुळे मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडिओत नताशा काळ्या रंगच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. पापाराझींना फोटोसाठी नताशाने पोझही दिल्याचं दिसत आहे. पण, नताशाचा हा लूक मात्र नेटकऱ्यांना रुचलेला नाही. नताशाला पाहून नेटकऱ्यांना उर्फीची आठवण झाली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 


"उर्फी बनायचा प्रयत्न", "उर्फीकडून प्रेरणा घेतली आहे का" असं म्हणत नताशाची उर्फीबरोबर तुलना केली आहे. "चांगली नाही दिसत आहेस", "हार्दिकशी घटस्फोट घेतल्यानंतर जास्तच सक्रिय झाली आहे", असंही काहींनी म्हटलं आहे. 

बादशहाच्या डीजे वाले बाबू गाण्यातून नताशा प्रसिद्धीझोतात आली होती. २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू असताना नताशाने हार्दिकबरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना अगस्त्य हा मुलगा आहे. 
 

Web Title: natasa stankovic looking stunning in black dress netizens compare her with urfi javed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.