हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा पुन्हा प्रेमाच्या शोधात, स्वतः शेअर केली पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:22 IST2025-01-02T12:21:48+5:302025-01-02T12:22:35+5:30

नताशा स्टँकोव्हिच हिची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 

Natasa Stankovic Prays For Finding Love In 2025 Shares Unseen Pics With Her Son Agastya | Hardik Pandya Ex Wife | हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा पुन्हा प्रेमाच्या शोधात, स्वतः शेअर केली पोस्ट!

हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा पुन्हा प्रेमाच्या शोधात, स्वतः शेअर केली पोस्ट!

दिवसामागून दिवस जातात, महिने उलटतात अन् वर्षही सरत जातं. या वर्षभराच्या प्रवासात अनेक भल्याबुऱ्या घटना, प्रसंग अनुभवाला येतात. अखेर उत्साहाने नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आणि 2024 या वर्षाला निरोप दिला जातो. अनेकांनी सोशल मीडियावर विविध पोस्ट करत वर्षभरातील खास आठवणींना उजाळा दिला आणि नव्या वर्षाकडून काय हवंय याचा संकल्प केलाय. याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच हिची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 

नताशा स्टँकोव्हिचने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये ती 2025 मध्ये आपल्याला प्रेम मिळो असे म्हणताना दिसली.  नताशाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं, "2024 मला खूप आवडले. या वर्षानं मला खूप काही शिकवलं, त्याबद्दल मी ऋणी आहे. 2025 हे वर्ष शांत, आनंद आणि प्रेम देणारे असो, अशी मी प्रार्थना करते". नताशा हिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


नताशा आणि हार्दिकने जुलै महिन्यात घटस्फोट घेत असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं. लग्नानंतर 4 वर्षांनी नताशा आणि हार्दिक घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा असून तो आता चार वर्षांचा आहे. हार्दिकशी लग्न केल्यानंतर नताशा इंटस्ट्रीपासून दूर गेली होती. पण, घटस्फोटानंतर नताशाने पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. 

Web Title: Natasa Stankovic Prays For Finding Love In 2025 Shares Unseen Pics With Her Son Agastya | Hardik Pandya Ex Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.