Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : घटस्फोटानंतर नताशाने शेअर केला पहिला व्हिडीओ, खेळताना दिसला हार्दिकचा लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 07:16 PM2024-07-19T19:16:07+5:302024-07-19T19:16:53+5:30

घटस्फोट जाहीर झाल्यानंतर नताशाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Natasa Stankovic shares first post after announcing separation from Hardik Pandya, spends quality time with son Agastya | Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : घटस्फोटानंतर नताशाने शेअर केला पहिला व्हिडीओ, खेळताना दिसला हार्दिकचा लेक

Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : घटस्फोटानंतर नताशाने शेअर केला पहिला व्हिडीओ, खेळताना दिसला हार्दिकचा लेक

Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : क्रिकेट आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत कालपासून एकच चर्चा आहे ते म्हणजे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशाचा (Natasa Stankovic) घटस्फोट. गेल्या काही दिवसांपासून ज्याची चाहूल होती तेच घडले. काल हार्दिक आणि नताशाने सोशल मीडिया पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला. सध्या नताशा ही मुलगा अगस्त्यसह तिचं होमटाऊन सर्बियाला पोहोचली आहे. घटस्फोट जाहीर झाल्यानंतर नताशाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशा भारत सोडून सर्बियाला गेली आहे. घटस्फोटाच्या घोषणेनंतर सुमारे 15 तासांनंतर नताशाने सोशल मीडियावर चाहत्यांना मुलगा अगस्त्य पांड्याची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये अगस्त्य हा चेंडू शोधताना पाहायला मिळतोय. अगस्त्यला पाहून सोशल मीडियावर नेटकरी त्याच्याविषयी काळजी व्यक्त करत आहेत.  सध्या नताशादेखील सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 

लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशा वेगळे झाले आहेत. बरेच प्रयत्न करुनही ते नातं टिकवू शकले नाहीत. आयपीएलपासूनच दोघांमध्ये बिनसल्याचं समोर आलं होतं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही नताशान हार्दिकसाठी एकही पोस्ट केली नव्हती. यानंतर तिने आयुष्यासंदर्भात अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या होत्या. काल दोघांनी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं. 

Web Title: Natasa Stankovic shares first post after announcing separation from Hardik Pandya, spends quality time with son Agastya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.