हार्दिक पंड्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल, म्हणाली - "देवाकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:32 PM2024-05-29T13:32:06+5:302024-05-29T13:32:58+5:30

सध्या क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) चर्चेत आली आहे. ते दोघे वेगळे होत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

Natasha's cryptic post goes viral amid divorce talks with Hardik Pandya, says - "To God..." | हार्दिक पंड्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल, म्हणाली - "देवाकडे..."

हार्दिक पंड्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल, म्हणाली - "देवाकडे..."

सध्या क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) चर्चेत आली आहे. ते दोघे वेगळे होत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. तिने तिच्या नावातून पंड्या हे आडनाव काढून टाकले तेव्हा लोकांना वाटले की तिने क्रिकेटर हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतला आहे. ते दोघे वेगळे झाल्याचा दावा अनेकजण करत आहेत. अभिनेत्रीचा तिच्या मित्रासह फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर अफवांना वेग आला.

नताशा आणि हार्दिकने बऱ्याच दिवसांपासून एकत्र कोणताही फोटो पोस्ट केला नाही आणि अभिनेत्री आयपीएल सामन्यांदरम्यान हार्दिकला सपोर्ट करतानाही दिसली नाही. हे पाहून लोकांनी ते दोघे वेगळे झाल्याचा तर्क लावला आहे. ती दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली होती. त्यावेळी तिला पापाराझींनी घटस्फोटाच्या चर्चेवर प्रतिक्रिया द्यायला सांगितली तेव्हा तिने 'धन्यवाद' म्हटले आणि तिथून . आता नताशा स्टॅन्कोविकने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे, जी लोक तिच्या घटस्फोटाच्या अफवांशी जोडत आहेत.

नताशाच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले
नताशा स्टॅन्कोविकने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो वांद्रे वरळी सी लिंकचा आहे. तिने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'देवाकडे प्रार्थना केली आहे.' अभिनेत्रीची ही पोस्ट व्हायरल होत आहे. लोक त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या घडामोडींकडे लक्ष देत आहेत. एका Reddit युजरने कमेंट केली होती की हार्दिक पंड्याने ४ मार्च रोजी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी नताशाबद्दल काहीही पोस्ट केले नव्हती.

हार्दिक-नताशाच्या नात्यात दुरावा?
नेटकरी असाही दावा करत आहेत की अभिनेत्रीने तिच्या मुलासोबतचे फोटो सोडून हार्दिकसोबतचे फोटो काढून टाकले आहेत. त्यामुळे लोक त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे बोलत आहेत. कारण नताशा आयपीएलमध्ये दिसली नाही किंवा तिने हार्दिकच्या टीमशी संबंधित फोटो पोस्ट केली नाही. जरी क्रिकेटरचा भाऊ कृणाल पंड्या अजूनही तिच्या पोस्टवर कमेंट करत आहे आणि त्यांचा मुलगा अगस्त्यसोबत फोटो पोस्ट करत आहे.
 

Web Title: Natasha's cryptic post goes viral amid divorce talks with Hardik Pandya, says - "To God..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.