Nation Wants To Know : ‘कॉफी विद डी’ नवे गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2016 09:18 PM2016-12-31T21:18:17+5:302016-12-31T21:18:17+5:30

'Nation Wants To Know' song from 'Coffee With D' out ; या चित्रपटात सुनील ग्रोव्हर अर्णब नावाच्या पत्रकाराची भूमिका करीत आहे. त्याचे हे पात्र प्रसिद्ध टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी मिळते जुळते आहे.

Nation Wants To Know: 'Coffee With D' New Song Release | Nation Wants To Know : ‘कॉफी विद डी’ नवे गाणे रिलीज

Nation Wants To Know : ‘कॉफी विद डी’ नवे गाणे रिलीज

googlenewsNext
ong>अभिनेता सुनील ग्रोव्हरचा आगामी चित्रपट ‘कॉफी विद डी’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या टीझरने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. आता या चित्रपटातील ‘नेशन वॉन्टस् टू नो’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे चित्रपटातील विनोद दाखविणारे आहे. 

अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्ह्यू घेण्याची धडपड करणाºया एका टीव्ही रिपोर्टरच्या प्रयत्नांचे विनोदी किस्से कॉफी विद डी या चित्रपटातून यातून दाखविण्यात येणार आहे. सुनील ग्रोव्हर, अंजना सुखानी व जाकिर हुसैन यांच्या प्रमुख भूमिक ा या चित्रपटात आहेत. एका बंद होणाºया चॅनलला उभारी देण्यासाठी या चॅनलचा प्रमुख अ‍ॅकर दाऊद इब्राहिमच्या इंटरव्ह्यू करण्याचा निर्णय घेतो. यातून कॉमेडी निर्माण होते असे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटात सुनील ग्रोव्हर अर्णब नावाच्या पत्रकाराची भूमिका करीत आहे. त्याचे हे पात्र प्रसिद्ध टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी मिळते जुळते आहे. 



चित्रपटातील ‘नेशन वॉन्टस् टू नो’ हे गाणे त्याच्या पत्रकारितेवर आधारित असून ही लाईन पत्रकार अर्णब गोस्वामी यांची थिम लाईन होती हे विशेष. ‘कॉफी विद डी’च्या गाण्याची शब्दरचना सुपरबिया यांची असून संगीत दिग्दर्शन संगीतकार त्रिकूट शान, गौरव आणि रोशनी यांनी केले आहे. शान याने स्वत: हे गाणे गायले आहे. गाण्याचे बोल दुनिया की बज गयी असे असून थीम ‘नेशन वॉन्टस् टू नो’ अशी आहे. या गाण्यावर सुनील ग्रोव्हर, अंजना सुखानी व दीपनीता शर्मा डान्स करताना दिसत आहे. हा चित्रपट ६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.  

Web Title: Nation Wants To Know: 'Coffee With D' New Song Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.