National Film Award: कंंगना राणौत पुन्हा एकदा ठरली अभिनयातील क्वीन, चौथ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:52 IST2021-03-22T17:51:20+5:302021-03-22T17:52:02+5:30
67th national film awards: Bollywood's Queen Kangana Ranaut wins National Award for the fourth time :- बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

National Film Award: कंंगना राणौत पुन्हा एकदा ठरली अभिनयातील क्वीन, चौथ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अभिनेता मनोज वाजपेयीला भोंसले चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट छिछोरेला मिळाला आहे. 67th national film awards: Bollywood's Queen Kangana Ranaut wins National Award for the fourth time
कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तिला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वात आधी २००८ साली चित्रपट फॅशनसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर २०१४ साली क्वीन चित्रपटासाठी तिची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. २०१४ नंतर २०१५ साली कंगनाने पुन्हा एकदा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार तिला तनू वेड्स मनु रिटर्न्ससाठी मिळाला होता. आता चौथ्यांदा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मणिकर्णिका चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
तर अभिनेता मनोज वाजपेयीला तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मनोज वाजपेयी सर्वात आधी २००० साली सत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २००५ साली मनोजला स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आता तिसऱ्यांदा २०१८ला रिलीज झालेला चित्रपट भोंसलेमधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.