'या' बॉलिवूड अभिनेत्यानं उचलली पाच मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:04 IST2025-01-24T19:04:16+5:302025-01-24T19:04:34+5:30

अभिनेत्यानं पाच मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

National Girl Child Day 2025 Aditya Seal Took Responsibility Of Education Of 5 Underprivileged Girls | 'या' बॉलिवूड अभिनेत्यानं उचलली पाच मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

'या' बॉलिवूड अभिनेत्यानं उचलली पाच मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

National Girl Child Day 2025: भारतात २४ जानेवारी हा दिवस भारतात सर्वत्र राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी मुलींच्या हक्क, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जातो.  या खास दिवशी बॉलिवूड अभिनेता आदित्य सीलने  (Aditya Seal) एक प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला आहे. आदित्यने पाच वंचित मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.

आदित्यने नेहमीच त्याची पत्नी अनुष्का रंजनला पाठिंबा देत आहे. अनुष्का ही एक अभिनेत्री असण्यासोबतच  सामाजिक कार्यकर्तीदेखील आहे. ती आपल्या एनजीओद्वारे मुलींना मदत करते.  अनुष्काच्या कामाचं कायमच आदित्य कौतुक करत आला आहे. आता अनुष्कासोबत त्यानेही मुलींच्या भविष्यासाठी एक पाऊल उचललं आहे. 

आदित्यने पाच मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. जेणेकरून त्या कॉलेजपर्यंतचे शिक्षण घेतली आणि स्वप्ने पूर्ण करू शकतील. याबद्दल तो म्हणाला, "शिक्षण ही कोणालाही देऊ शकणारी सर्वात मोठी भेट आहे आणि मला या मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा भाग व्हायचं आहे. त्यांना वाढताना, यशस्वी होताना आणि महाविद्यालयातून पदवीधर होताना पाहणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण असेल".


अभिनेत्याच्या या कृतीनं चाहत्याचं मन जिंकलंय. आदित्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'अमर प्रेम की प्रेम कहाणी', 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमात त्यानं काम केलं आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावर आदित्यची तगडी फॅनफॉलोइंगही पाहायला मिळते. अभिनेत्यानं मोठ्या पडद्यावर निगेटिव्ह भुमिका साकारल्यात. पण खऱ्या आयुष्यात मात्र रिअर हिरो असल्याचं सिद्ध केलय.


राष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास

भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने २००८ साली राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हा पासून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. एका कन्येने या दिवशी देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेऊन इतिहास रचला. त्यामुळे २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

Web Title: National Girl Child Day 2025 Aditya Seal Took Responsibility Of Education Of 5 Underprivileged Girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.