सलमानच्या पनवेल फार्महाऊसची रेकी करणाऱ्या सुक्खाला अटक, नवी पोलिसांचा फिल्मी प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:55 AM2024-10-17T11:55:14+5:302024-10-17T11:56:24+5:30

सलमान खान प्रकरणात नवीन मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर सुक्खाला अटक केली आहे.

Navi mumbai police arrest shooter from lawrence bishnoi gang who was after salman khan at her panvel farmhouse | सलमानच्या पनवेल फार्महाऊसची रेकी करणाऱ्या सुक्खाला अटक, नवी पोलिसांचा फिल्मी प्लॅन!

सलमानच्या पनवेल फार्महाऊसची रेकी करणाऱ्या सुक्खाला अटक, नवी पोलिसांचा फिल्मी प्लॅन!

दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतीखाली आहे. भाईजानला अनेकदा धमक्या आल्या असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. इतकंच नाही तर सलमानच्या जवळच्या लोकांनाही आता जीवाची भीती आहे. त्याचे खास मित्र आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात आता सलमानच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सलमान खान प्रकरणात नवीन मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर सुक्खाला अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी ही माहिती दिली. सुक्खा कालुयाला हरियाणातील पानीपतमधून ताब्यात घेतले. त्याला नवी मुंबईत घेऊन आले आणि आज कोर्टात हजर करणार आहेत. सुक्खाला पकडण्यासाठी पनवेल सिटी पोलिस आणि पानीपत पोलिसांनी जॉइंट ऑपरेशन केले. सुक्खा एका  हॉटेलमध्ये लपला होता. ओळख पटू नये म्हणून त्याने दाढी आणि केसही वाढवले होते. पोलिसांच्या चौकशीत सुक्खाने तो लॉरेन्स गँगसोबत बरेच वर्षांपासून जोडला गेल्याचं सांगितलं. तसंच या गँगचं नेटवर्क अनेक गावांमध्ये पसरलं आहे. बरीच मुलं या गँगमध्ये सामील आहेत. सुक्खानेच सलमानच्या घराबाहेर फायरिंगसाठी हत्यार पुरवले होते.

नवी मुंबई पोलिसांच्या सांगण्यानुसार, शूटर सुक्खाच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. सुक्खा तो आरोपी आहे ज्याने सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसची रेकी केली होती. तसंच फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट रचला होता. या प्रकरणात याआधी ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. 

Web Title: Navi mumbai police arrest shooter from lawrence bishnoi gang who was after salman khan at her panvel farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.