दुर्गापूजेत काजोलचा रुद्रावतार! आरती थांबवत माईक हातात घेऊन कोणावर भडकली? व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 15:55 IST2024-10-11T15:54:37+5:302024-10-11T15:55:00+5:30
एका दुर्गापूजेतील बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पूजेदरम्यान काजोल भडकल्याचं दिसत आहे.

दुर्गापूजेत काजोलचा रुद्रावतार! आरती थांबवत माईक हातात घेऊन कोणावर भडकली? व्हिडिओ व्हायरल
सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाचा माहौल आहे. गणेशोत्सवानंतर मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्व साजरा होतो. नऊ दिवस देवीची आराधना करून मोठ्या भक्तीभावाने भाविक पूजा करतात. दरवर्षी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही दुर्गापूजेत सहभागी होतात. अशाच एका दुर्गापूजेतील बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पूजेदरम्यान काजोल भडकल्याचं दिसत आहे.
वुम्पला या इन्स्टाग्राम पेजवरुन काजोलचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दुर्गापूजा करताना चप्पल घालून आल्याचं पाहून काजोलचा राग अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरती सुरू होत असतानाच ती मध्येच थांबवून काजोलने चप्पल घालून दुर्गापूजेत सहभागी होणाऱ्याला चांगलंच सुनावल्याचं व्हिडिओत दिसत आहे. "चप्पल बाहेर काढ" असं काजोल म्हणत आहे. नंतर माईक घेऊन काजोलने त्या व्यक्तीला खडे बोल सुनावले आहेत. "आपण पूजा करतोय. थोडा आदर ठेवा", असंही काजोल म्हणत असल्याचं दिसत आहे. दुर्गापूजेदरम्यान काजोलचा हा रुद्रावतार पाहून इतर सदस्यही आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे.
दरवर्षी काजोल आणि राणी मुखर्जी नवरात्रीत दुर्गापूजेचं आयोजन करतात. अनेक सेलिब्रिटीही या दुर्गापूजेत सहभागी होताना दिसतात. या व्हिडिओतही काजोलबरोबर आलिया भट, तनिषा मुखर्जीही दिसत आहे. या दुर्गापूजेतील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.