Afwaah Trailer: एका अफवेने बदललं आयुष्य...! नवाजुद्दीन भूमी पेडणेकरच्या 'अफवाह'चा ट्रेलर पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 17:39 IST2023-04-20T17:37:59+5:302023-04-20T17:39:37+5:30
Afwaah Trailer: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा नवा सिनेमा येतोय. सिनेमाचं नाव आहे 'अफवाह'.

Afwaah Trailer: एका अफवेने बदललं आयुष्य...! नवाजुद्दीन भूमी पेडणेकरच्या 'अफवाह'चा ट्रेलर पाहिलात का?
Afwaah Trailer: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा नवा सिनेमा येतोय. सिनेमाचं नाव आहे 'अफवाह'. येत्या ५ मे राेजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एक अफवा आयुष्य कसं बदलवू शकते, अशी या सिनेमाची ढोबळ कथा.
ट्रेलरमध्ये अभिनेता सुमित व्यास एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसतो तर अभिनेत्री भूमी पेडणेकर त्याच्या भावी पत्नीच्या भूमिकेत दिसते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो, त्यानंतर तीन लोकांचं अख्खं आयुष्यच बदलून जातं. २ मिनिटं ३० सेकंदाचा हा ट्रेलर तुम्हाला खिळवून ठेवतो. 'एक बेवकूफ दूसरे बेवकूफ को एक चीज बताता है. वो बेवकूफ उस चीज को आगे 10 लोगों को बताता है बिना सोचे-समझे. अफवाहें ऐसे ही फैलती हैं.' हा भूमी पेडणेकरच्या तोंडचा डायलाॅग भाव खाऊन जातो.
सुधीर मिश्रा यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी, सुमीत व्यास आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'अफवाह' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनुभव सिन्हा हेच या सिनेमाचे प्रोड्यूसर आहेत. हा चित्रपट 5 मे 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यापूर्वी भूमी पेडणेकरने अनुभव सिन्हा यांच्या 'क्राऊड' या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटातील भूमीच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं होतं. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप झाला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी शेवटचा 'हिरोपंती 2' या चित्रपटात दिसला होता.