PHOTO : भाई, तुझी लेक तर फारच सुंदर आहे...! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीवर चाहते फिदा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:30 PM2022-09-26T18:30:52+5:302022-09-26T18:32:01+5:30
Nawazuddin Siddiqui daughter Shora : लवकरच नवाज ‘टिकू वेड्स शेरू’ या सिनेमात अवनीत कौरसोबत झळकणार आहे. पण सध्या चर्चा नवाजची नाही तर नवाजच्या लेकीची आहे.
Nawazuddin Siddiqui daughter Shora : बॉलिवूड नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. बॉलिवूडमध्ये नवाजने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच नवाज ‘टिकू वेड्स शेरू’ या सिनेमात अवनीत कौरसोबत झळकणार आहे. पण सध्या चर्चा नवाजची नाही तर नवाजच्या लेकीची आहे. होय, नवाजची लेक शोराचा फोटो पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत. सोशल मीडियावर तिचा फोटो तुफान व्हायरल होतोय.
काल डॉटर्स डेच्या मुहूर्तावर नवाजने लेक शोराचा फोटो शेअर केला . ‘तुझ्या हास्यापेक्षा काहीही अनमोल नाही शोरा... हॅपी डॉटर्स डे...,’ असा कॅप्शन देत नवाजने लेकीचा फोटो पोस्ट केला आणि तो क्षणात व्हायरल झाला. यात शोराच्या चेह-यावरची क्यूट स्माईल बघून सगळेच तिच्या प्रेमात पडले.
काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनचा ‘बारिश की जाए’ हे गाणं आलं होतं. तेव्हा या गाण्यावर नवाजने शोरासोबत एक रिल शेअर केलं होतं. यानंतर नवाजची लेक चांगलीच चर्चेत आली होती. सध्या चाहते शोराचं कौतुक करताना थकत नाहीये. नवाज भाई तुझी लेक खूपच सुंदर आहे. ओह, शी इज फॅब अशा आशयाच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
शूल आणि सरफरोश या सिनेमातून नवाजने करिअरची सुरुवात केली. पण या सिनेमात त्याच्या वाट्याला आलेली भूमिका इतकी लहान होती की, लोकांनी त्याला नोटही केलं नव्हतं. पण याच छोट्या छोट्या भूमिकांनी नवाजला मोठं बनवलं. इतकं मोठं की, आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं.
नवाजुद्दीन आज इंडस्ट्रीचं मोठं नाव आहे. 2021 साली त्याचे नेटवर्थ 13 मिलियन म्हणजेच 96 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन प्रत्येक महिन्याला 1 कोटींपेक्षा अधिकची कमाई करतो. कोटींची कमाई करतो. चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत आपला दबदबा निर्माण करणारा नवाजुद्दीन अलिशान आयुष्य जगतो. अर्थात आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. गावातील घरी वषार्तून एकदा तो नक्की जातो़ शेतात कामही करतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात नवाजुद्दीन गावातील छोट्याशा घरात अनेक महिने मुक्कामाला होता.