Nawazuddin Siddiqui : 'दुरुन बघितलं तर आयुष्य हे...' कौटुंबिक वादात नवाजुद्दीनने शेअर केली भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:34 IST2023-02-15T14:33:36+5:302023-02-15T14:34:18+5:30
अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी सध्या त्याच्या प्रोफेशनल नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

Nawazuddin Siddiqui : 'दुरुन बघितलं तर आयुष्य हे...' कौटुंबिक वादात नवाजुद्दीनने शेअर केली भावूक पोस्ट
Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी सध्या त्याच्या प्रोफेशनल नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिस्सा आणि पत्नी आलिया दोघींनी एकमेकींवर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. इतकंच नाही तर या सर्व प्रकरणात नवाजुद्दीन स्वत:च्या घरी न राहता हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली होती. या सर्व प्रकारामुळे नवाज मात्र हतबल झाल्याचं दिसत आहे. त्याने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट मधून याचा प्रत्यय येतोय.
नवाजने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो हतबल झाल्याचे स्पष्ट कळते. या फोटोला त्याने चार्ली चॅप्लीनचे एक वाक्य कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तो लिहितो, 'जवळून बघितलं तर आयुष्य हे एक ट्रॅजेडीने भरलेलं आहे, मात्र दुरुन बघितलं तर ते तितकंच विनोदी देखील आहे.' कॉमेडियन चार्ली चॅप्लिनचे हे वाक्य आहे.
आलियानेही कायदेशीर मार्ग स्वीकारत नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला जेवण आणि मूलभूत सुविधा, अगदी बाथरूममध्येही जाऊ दिले नाही, असा आरोप केला. या वादाबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई कोर्टाने अभिनेत्याला नोटीस पाठवली आहे.
आलियाच्या वकिलाने सांगितले की, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबातील कोणीही आलियाला 7 दिवस जेवण दिले नव्हते. तिला झोपण्यासाठी बेडही दिला नाही. आलियाला आंघोळीसाठी बाथरूममध्येही जाण्याची परवानगी नाही. एवढेच नाही तर आलियाच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत. त्याच्या खोलीबाहेर बॉडीगार्ड २४ तास तैनात असतात.
तर दुसरीकडे नवाजच्या वकिलांनी आलियाच्या चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केलेत. नवाजुद्दीनचा कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. नवाज लवकरच 'हड्डी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याने ट्रांसजेंडरची भूमिका केली आहे.