नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या मजेशीर अंदाजात सेटवरच वातारण ठेवतो रिलीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2017 12:46 PM2017-06-05T12:46:32+5:302017-06-05T18:16:32+5:30
'सरफरोश' चित्रपटातून एका छोट्याशा भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवाजला ...
' ;सरफरोश' चित्रपटातून एका छोट्याशा भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवाजला नेहमीच त्याच्या अभिनयातील गंभीरता आणि लूकसाठी ओळखले जाते. सुरुवातील त्याच्यासोबत चित्रपटात काम करणारे सहकलाकार त्याच्याशी सहस बोलायला जात नाहीत. मात्र त्याच्यासोबत चित्रपटात काम केलेल्या लोकांचे म्हणणे आहे नवाज एका मजेशीर आणि सहज कोणातही मिसळून जाणारा अभिनेता आहे. सध्या तो नंदिता दास दिग्दर्शित 'मंटो' चित्रपटात मंटोची भूमिका साकारत आहे. याचित्रपटात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजेच 'साफिया मंटो'च्या भूमिकेत अभिनेत्री रसिका दुग्गल दिसणार आहे. रसिका नवाजची स्तुती करताना अजिबात थकत नाही. याचित्रपटाचा पहिला शॉट जेव्हा तिला नवाजसोबत शूट करायचा होता त्यावेळी रसिका खूपच नर्व्हस झाली होती. पडद्यावरच्या नवाजच्या गंभीर इमेजमुळे रसिका नर्व्हस झाल्याचे सांगते. मात्र नवाज आपण विचार केलेल्या इमेजपेक्षा खूप वेगळा आहे नवाज सेटवर सगळ्यांना जोक्स सांगून वातावरण हलकफुलके ठेवण्याचा प्रयत्न करतो. सेटवर तो खूप धमाल मस्ती करतो. ज्या पद्धतीच्या भूमिका त्यांने आतापर्यंत मोठ्या पडद्यावर साकारल्या आहेत त्याच्यापेक्षा खऱ्या आयुष्यात तो एकदम वेगळा आहे. कधी कधी तो चेहऱ्यावर गंभीरता ठेवून विनोद करतो त्यामुळे तो विनोद करतोय की गंभीर पण काही बोलतोय हे ठरवणे कठीण जाते असे रसिका दुग्गलचे म्हणणे आहे. मंटो हा चित्रपट पाकिस्तानी पटकथा लेखक सआदत हसन मंटोवर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. या चित्रपटामध्ये १९४० चा काळ साकारण्यात दाखवण्यात येणार आहे. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतर फुटकळ साहित्य लिहिले.