आता मी पुन्हा लिहिन अन् सगळे खोटे-खोटे लिहिन...; बायोग्राफीच्या ‘त्या’ वादावर बोलला नवाजुद्दीन सिद्दीकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 07:17 PM2018-09-16T19:17:16+5:302018-09-16T19:18:02+5:30
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीचा वाद चांगलाच गाजला होता़ इतका की, नवाजुद्दीनला आपले हे पुस्तक मागे घ्यावे लागले होते. या गाजलेल्या अंकावर नवाजुद्दीन पुन्हा एकदा बोलला.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीचा वाद चांगलाच गाजला होता़ इतका की, नवाजुद्दीनला आपले हे पुस्तक मागे घ्यावे लागले होते. या गाजलेल्या अंकावर नवाजुद्दीन पुन्हा एकदा बोलला. होय, बायोग्राफी मागे घेण्याच्या निर्णयावर त्याने दु:ख व्यक्त केले. इतकेच नाही तर, मी पुन्हा बायोग्राफी लिहिणार आणि यावेळी सगळे खोटे लिहिणार. मग लोक माझे हे पुस्तक आवडीने वाचतील, माझी वाह-वाह करतील. कारण ‘फेमस’ व्यक्तिंची पुस्तके सगळेच वाचतात, असे तो म्हणाला. अर्थात उपहासाने. बीबीसीशी दिलेल्या विशेष मुलाखतीत नवाज पहिल्यांदा या मुद्यावर उघडउघड बोलला. माझे पुस्तक २०९ पानांचे होते. केवळ ४-५ पानेचं माझ्या रिलेशनशिपबद्दल होती. मी नावानिशी काही गोष्टी लिहिल्या आणि हीच चूक झाली. मी चूक स्वीकारली आणि पुस्तक मागे घेतले. उरलेल्या २०४ पानांत मी माझा संघर्ष लिहिला होता. मी कसा लहान गावातून आलो, मी कसा घडलो, माझे विचार कसे बदलले. मी जो काही चांगला-वाईट आहे, सगळे लिहिले होते. या पुस्तकातील सगळ्या गोष्टी अतिशय स्वच्छ व खऱ्या होत्या. माझ्यातील अनेक वाईट गोष्टींवर मी उघडपणे जगाला सांगितल्या होत्या. पण त्याकडे लक्ष न देता केवळ ४-५ पानांचा बाऊ केला गेला. अशास्थितीत पुस्तक मागे घेणेचं मला योग्य वाटले. कारण शेवटी मी ‘फेमस’(उपहासाने) झालोच होतो ना, असे नवाजुद्दीन यावेळी म्हणाला.
आपल्या बायोग्राफीत नवाजने सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन स्त्रियांचा उल्लेख केला होता. त्यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल सविस्तर लिहिले होते. मला माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींच्या प्रेमापेक्षा त्यांच्या शरिरात अधिक रस होता, अशी बेधडक कबुली त्याने या पुस्तकातून दिली होती. निहारिकाबद्दल तर त्याने अगदीच खुलेपणाने लिहिले होते. निहारिकाला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो. माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तेथून निघायचे,असे नवाजने यात म्हटले होते.नवाजच्या या खुलाशावर निहारिकाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. नवाजची बायोग्राफ पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे तिने म्हटले होते. नवाजची पूर्वप्रेयसी सुनीता राजवार हिनेही या बायोग्राफीवर आक्षेप नोंदवला होता. मी गरिब असल्याने सुनीताने मला सोडले, असे नवाजने बायोग्राफीत लिहिले होते. पण सुनीताने नवाजचा हा दावा फेटाळून लावला होता.