नवाजुद्दीन सिद्दीकीने ह्या सिनेमासाठी घेतले केवळ १ रुपया मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:02 PM2018-08-29T19:02:25+5:302018-08-29T19:03:43+5:30

अभिनेत्री व दिग्दर्शिका नंदिता दासचा आगामी चित्रपट ‘मंटो’साठी नवाजुद्दीन सिद्दीकीने फक्त एक रुपया घेतला आहे.

Nawazuddin Siddiqui take only Rs. 1 for this film | नवाजुद्दीन सिद्दीकीने ह्या सिनेमासाठी घेतले केवळ १ रुपया मानधन

नवाजुद्दीन सिद्दीकीने ह्या सिनेमासाठी घेतले केवळ १ रुपया मानधन

googlenewsNext
ठळक मुद्दे सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारित ‘मंटो’ चित्रपट‘मंटो’ यांच्या योगदानाची तुलना पैशांत करणे शक्य नाही - नवाज

एका सिनेमात काम करण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार लाखो किंवा कोटींचे मानधन घेत असल्याचे आपण बऱ्याचदा ऐकले आहे. मात्र अभिनेत्री व दिग्दर्शिका नंदिता दासचा आगामी चित्रपट ‘मंटो’साठी नवाजुद्दीन सिद्दीकीने फक्त एक रुपया घेतला आहे.


समाजातून जाणिवपूर्वक वगळल्या जाणाऱ्या विषयांना हात घालत त्या विषयांवर आपल्या शब्दांतून वक्तव्य करणाऱ्या सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नवाजने सआदत हसन मंटो यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधून नवाजच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र मंटो यांची भूमिका साकरण्यासाठी नवाजने फक्त एक रुपयाच मानधन म्हणून घेतले असे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिता दास यांनी सांगितले आहे.
‘मंटो’ हे खूप मोठे होते. त्यांच्या योगदानाची तुलना पैशांत करणे शक्य नाही, म्हणूनच त्यांच्याप्रती आदर आणि प्रेम यामुळे नवाजने मानधन न आकारण्याचे ठरवले आहे. २१ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनसोबतच रसिका दुग्गल, ताहिर राज भसीन, दिव्या दत्ता आणि ऋषी कपूर यांच्याही भूमिका आहेत.
सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्र्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतरही साहित्य लिहिले. 

Web Title: Nawazuddin Siddiqui take only Rs. 1 for this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.