गांजा घेतल्यानंतर मला मजा येते! पहिल्यांदाच व्यसनाबद्दल बोलला नवाजुद्दीन, म्हणतो- NSD मध्ये असताना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 08:53 IST2024-01-27T08:52:58+5:302024-01-27T08:53:35+5:30
"गांजा घेतल्यानंतर मी माझा राहत नाही", नवाजुद्दीनचं वक्तव्य चर्चेत

गांजा घेतल्यानंतर मला मजा येते! पहिल्यांदाच व्यसनाबद्दल बोलला नवाजुद्दीन, म्हणतो- NSD मध्ये असताना...
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. अभिनय आणि अपार मेहनतीच्या जोरावर नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेला नवाजुद्दीन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं. नेहमी दारू पित नसल्याचा खुलासा करत नवाजुद्दीनने एक प्रसंगही या मुलाखतीत सांगितलं.
नवाजुद्दीनने नुकतीच 'समदीश अनफिल्टर्ड शो'मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं. "मी नेहमी व्यसन करत नाही. आणि केलं तरी अगदी कमी प्रमाणात करतो," असं नवाजुद्दीन म्हणाला. पुढे नवाजुद्दीनने पहिल्यांदा दारू पिण्याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, "NSD मध्ये असताना मी पहिल्यांदा व्यसन केलं होतं. प्रयोग संपल्यानंतर आम्ही सेलिब्रेट करत होतो. सगळ्यांनी बिअर आणली होती. त्याच्याआधी मी कधीच प्यायलो नव्हतो. मी प्रयोगातच पहिल्यांदा सिगारेट ओढली होती."
"होळी हा माझा आवडता सण आहे. कारण, तेव्हा थंडाई प्यायला मिळते. स्वानंद किरकिरेने मला थंडाई पाजली आणि मी पीत गेलो. त्यानंतर काही वेळाने काय होतंय ते मला कळतच नव्हतं. दोन दिवस नशा उतरलीच नव्हती. त्यानंतर मी नॉर्मल झालो. प्यायलानंतर मी महान अभिनेता आहे असं मला वाटतं," असंही नवाजुद्दीन म्हणाला. त्याने या मुलाखतीत गांजा घेतल्याचा अनुभवही सांगितला. तो म्हणाला, "गांजा घेतल्यानंतर मला चांगलं वाटतं. मला खूप मजा येते. मी गाणं सुरू केल्यानंतर काहीतरी वेगळंच होतो."