नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाचा युटर्न,आता स्वतःलाच नकोय घटस्फोट, दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 03:40 PM2021-03-05T15:40:41+5:302021-03-05T15:41:30+5:30
आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीसही पाठवली होती. मात्र यावर नवाजने कोणतेच उत्तर दिले नव्हते. आता या दोघांबाबत नवीन माहिती समोर येत आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या लग्नाला जवळपास दहा वर्षे झाले आहेत. दहा वर्षानंतर आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. आलियाचाने नवाजवर आरोप केले होते की, नवाज तिची आणि मुलांची काळजी घेत नाही. त्यामुळे नाते आणखीन ताणण्यापेक्षा संपवण्यासाठी मी लाचार झाली असल्याचे म्हणत आलियाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. इतकेच नाही तर आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीसही पाठवली होती. मात्र यावर नवाजने कोणतेच उत्तर दिले नव्हते. आता या दोघांबाबत नवीन माहिती समोर येत आहे. आलियालाच आता नवाजपासून घटस्फोट नकोय.
नवाजपासून वेगळे न होण्यामागील कारणांबद्दल बोलताना आलियाने एका मुलाखतीत सांगितले की, 'ती गेल्या 10 दिवसांपासून कोरोना झाल्यामुळे मुंबईतल्या घरीच उपचार घेत आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये आहे. अशावेळी मुलांना नवाज सांभाळत आहे. नवाज सध्या त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. लखनौमध्ये तो शूटिंग करतोय. मात्र काम सांभाळून तो मुलांचीही काळजी घेत आहे.
11 वर्षाची मुलगी सोरा आणि 6 वर्षाचा मुलगा या दोघांची काळजी सध्या नवाज घेतोय. त्यामुळे ज्या गोष्टींसाठी नवाजपासून आलिया वेगळी होणार होती. पूर्वीसारखा नवाज आता राहिला नाहीय. ज्या रितीने तो सध्या मुलांचा सांभाळ करतोय नवाजचे हे रुप पाहून सध्या आलिया खूप इम्प्रेस झाली आहे. प्रेमळ पित्याच्या रुपात नवाजला पाहून खूप आनंदी असल्याचे आलियाने सांगितले आहे.
नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो अतिशय छोट्याशा भूमिकांमध्ये दिसला. पण ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.