'बॉलिवूडमधील वर्णद्वेषाबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेले विधान आले चर्चेत, म्हणाला-एकतरी काळी..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:53 PM2022-03-29T18:53:34+5:302022-03-29T18:59:22+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील वर्णव्देषावर अनेकवेळा स्पष्टपणे बोलला आहे.
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्या कसदार अभिनयानं अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. बॉलिवूडमधील वर्णव्देष आणि घराणेशही यावर मुद्द्यावरून अनेकवेळा वाद झालेत. काही आभिनेता आणि अभिनेत्री यावर आपलं स्पष्ट बोलतात तर एक गट असाही आहे तो यासर्वांवर मौनं बाळगणं पसंत करतो. नवाजचं नाव पहिल्यात गटात येतं जोवर खुलेपणे बोलतो. पुन्हा एक नवाज बी-टाऊनमधील वर्षव्देषावर बोलला आहे. याआधीही तो या मुद्द्यांवर स्पष्टपण बोलला आहे. बरेच लोक आहेत की जे उत्कृष्ट अभिनय करतात आणि मेहनती देखील आहेत..
अलीकडेच एका मुलाखती दरम्यान नवाज म्हणाला, “मला एक अशी स्टार किंवा सुपरस्टार अभिनेत्री दाखवा जी काळी आहे, काळे लोक चांगला अभिनय करू शकत नाहीत का? आपल्या समाजात जी परिस्थिती आहे तीच बॉलिवूडमध्ये ही आहे. मी तर माझ्या जिद्दीमुळे स्टार झालो. अनेक अभिनेत्रींमध्येही अशी जिद्द होती, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या अभिनयातही ती गोष्ट असली पाहिजे. असं नवाजुद्दीन म्हणाला. वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन इंडस्ट्रीमध्ये लोक खूप भेदभाव करतात.नवाजने आपल्या नात्यातील एका काळ्या आणि गोऱ्या मुलीचं उदाहरण देऊन हे अधोरेखित केलं.
नवाज म्हणाला, मी इथे (बॉलिवूड) कोणाच्या उपकारांनी आलेलो नाही. मी माझ्या जिद्दीमुळे आलो आहे आणि मुलींमध्येही जिद्द असायला हवी जेणेकरून त्या इथपर्यंत पोहोचतील. पण स्त्री किती वर्षे संघर्ष करणार, कारण बॉलिवूडमध्ये महिलांना काळ केवळ ३५ वर्षांपर्यंत असतो. मी तर 15-20 वर्षे संघर्ष केला आहे.
मणिकर्णिका फिल्म्सच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक डार्क कॉमेडी सिनेमा आहे याची निर्मिती कंगना राणौवत करतेय.