सिद्दिकीचा 'ठाकरे' रिलीज होणार 'या' दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 02:36 PM2018-07-20T14:36:20+5:302018-07-20T14:45:36+5:30

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारा नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत 'ठाकरे' या चित्रपटाचा आम्ही एक भाग आहोत हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे

Nawazuddin Siddiqui's 'Thackeray' will be released on 'On' this day | सिद्दिकीचा 'ठाकरे' रिलीज होणार 'या' दिवशी

सिद्दिकीचा 'ठाकरे' रिलीज होणार 'या' दिवशी

googlenewsNext
ठळक मुद्देनवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत 'ठाकरे' चित्रपट अभिजीत पानसे दिग्दर्शित करीत आहेतहिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक व भाषिक चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे

राष्ट्रीय आणि जागतिक व्यासपीठावर मराठी माणसांची शक्ती स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची कथा अलौकीक आणि अमर आहे. उत्कृष्ट व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय रोमांचक आहे. नम्र सुरवातीपासून चालत आलेला त्यांचा जीवन प्रवास सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गरजला.  

बाळासाहेब ठाकरें यांचे धडाडी तसेच चित्तवेधक जीवन एखाद्या चित्रपटात समाविष्ट करण्यासाठी शिवसेनेचे खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांच्यापेक्षा कोण योग्य असू शकेल? बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास संजय राऊत यांनी जवळून स्वतःहून अनुभवला आहे. म्हणूनच संजय राऊत लिखित आणि निर्मित 'ठाकरे' चित्रपटाचे शूट सुरु असतानाच तो सर्वत्र चर्चेत आहे. राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी अंतर्गत नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत 'ठाकरे' चित्रपट अभिजीत पानसे दिग्दर्शित करीत आहेत. 

१९६०च्या दशकातील जुन्या मुंबईचे दर्शन घडवणारे भव्यदिव्य सेट्स नवाझ यांचा हुबेहूब बाळासाहेबांसारख्या दिसणारा लूक  व 'ठाकरे' चित्रपटाचा रंजक टिझर यांमुळे संजय राऊत यांच्यासमवेत 'ठाकरे' चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी कार्निवल मोशन पिक्चर्स उत्सुक आहेत. सचिन: अ बिलियन ड्रीम्स या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने कार्निवल मोशन पिक्चर्सने अभूतपूर्व यश प्राप्त केले. कार्निव्हल मोशन पिक्चर्स आता सक्रियपणे हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक व भाषिक चित्रपटांची निर्मिती करीत आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारा नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत 'ठाकरे' या चित्रपटाचा आम्ही एक भाग आहोत हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. याचप्रमाणे संजय राऊत यांच्यासमवेत २०१९ मधील सर्वांत जास्त प्रतीक्षेत असलेल्या 'ठाकरे' चित्रपटाची निर्मिती करताना देखील आम्हांस खूप आनंद होतो आहे."

कार्निवल मोशन पिक्चर्स समवेत हातमिळवणी कारण्याप्रसंगी संजय राऊत म्हणतात की, "जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटले जावे तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचेच! बाळासाहेब ठाकरेंसारख्या ज्वलंत व्यक्तिमत्त्वाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा बाळगून जगभरातील लाखो लोकांपर्यंत हा सिनेमा पोचण्यासाठी हातभार लावणाऱ्या कार्निव्हल मोशन पिक्चर्सचे 'ठाकरे' चित्रपट निर्मितीत स्वागत आहे. येत्या वर्षात जास्तीत जास्त जनतेपर्यंत त्यांच्या हृदयसम्राटाला पोहोचविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत." 

श्री संजय राऊत आणि डॉ. श्रीकांत भसी निर्मित आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेला 'ठाकरे' हा चित्रपट बाळासाहेबांच्या जयंती दिवशी २३ जानेवारी २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Nawazuddin Siddiqui's 'Thackeray' will be released on 'On' this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.