संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:29 AM2023-10-10T10:29:16+5:302023-10-10T10:29:50+5:30

हा एक म्यूझिकल पिरियड ड्रामा आहे.

nayanthara can be seen in sanjay leela bhansali s next project baiju bawra starring ranveer singh and alia bhat | संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार

संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार

googlenewsNext

साऊथची लेडी सुपरस्टार नयनताराचा (Nayanthara)आणखी एक बॉलिवूड प्रोजेक्ट चर्चेत आहे. 'जवान' नंतर नयनतारा आता संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) बहुचर्चित 'बैजू बावरा' (Baiju Bawra) सिनेमात झळकण्याची शक्यता आहे. नयनताराने 'जवान'मधून प्रेक्षकांचं मन जिंकलं. तिला पुन्हा एखाद्या हिंदी सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक होतेच. आता या बातमीने चाहत्यांनाही आनंद झाला आहे.

दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळींचा 'बैजू बावरा' हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. यामध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत असणार आहे. तर त्याच्या अपोझिट आलिया भट (Alia Bhat) मुख्य भूमिकेत असणार आहे. तसंच नयनतारालाही आणखी एका मेन लीडची ऑफर मिळाली आहे. हा एक म्यूझिकल पिरियड ड्रामा आहे. नयनताराला सिनेमासाठी ऑफर मिळाली असून तिने ती स्वीकारली आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नयनताराने याआधी शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमात मुख्य भूमिका साकारली. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर गेस्ट अपिअरन्समध्ये असलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणलाच जास्त फुटेज मिळालं. नयनतारापेक्षा सगळीकडे दीपिकाचीच चर्चा होती. त्यामुळे आता आलिया भट असताना नयनतारा 'बैजू बावरा' सिनेमाला होकार देईल का ही शंकाच आहे.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, नयनतारा आणि पती विघ्नेश सिवन मार्चमध्येच संजय लीला भन्साळींना भेटले होते. दोघंही या प्रोजेक्टमध्ये सोबत काम करु शकतात. जर सगळं नीट झालं तर नयनतारा, रणवीर सिंह आणि आलिया भट एकत्र येऊ शकतात.

Web Title: nayanthara can be seen in sanjay leela bhansali s next project baiju bawra starring ranveer singh and alia bhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.