नयनतारा व विग्नेश देवदर्शनात मग्न, नवविवाहित जोडप्याच्या ‘या’ कामाचं तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:24 PM2022-06-14T16:24:31+5:302022-06-14T16:26:10+5:30

Nayanthara Vignesh Shivan : लग्नानंतर सेलिब्रिटी हनीमूनचं प्लॅनिंग करतात. पण नयनतारा व विग्नेश हे नवविवाहित जोडपं हनीमूनऐवजी सध्या देवदर्शनात मग्न आहे.

nayanthara vignesh shivan Wedding couple offer food to the needy people | नयनतारा व विग्नेश देवदर्शनात मग्न, नवविवाहित जोडप्याच्या ‘या’ कामाचं तुम्हीही कराल कौतुक

नयनतारा व विग्नेश देवदर्शनात मग्न, नवविवाहित जोडप्याच्या ‘या’ कामाचं तुम्हीही कराल कौतुक

googlenewsNext

साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा  (Nayanthara) व साऊथचा दिग्गज दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan ) दोघंही नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर सेलिब्रिटी हनीमूनचं प्लॅनिंग करतात. पण नयनतारा व विग्नेश हे नवविवाहित जोडपं हनीमूनऐवजी सध्या देवदर्शनात मग्न आहे. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं सतत मंदिरांना भेटी देत देवदर्शन करताना दिसतंय. इतकंच नाही तर या मंदिरात, वृद्धाश्रमात, अनाथालयांत अन्नदान करत आहे.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नयनतारा व विग्नेश दोघंही तिरूपती मंदिरात भगवान व्यंकटेशचं दर्शन करायला पोहोचले होते. याचे फोटोही व्हायरल झाले होते.

सध्या हे कपल केरळमध्ये आहे. केरळमध्ये या दांम्पत्यानं चेट्टीकुलंगरा देवीच्या मंदिराला भेट दिली. केरळमध्ये नयनतारा व विग्नेश दोन आठवडे राहणार आहेत आणि येथे खास पूजा करणार आहेत.
लग्नानंतर अन्नदानाचं महान कार्यही दाम्पत्याच्या हातून घडतंय. हजारो लोकांना त्यांनी अन्नदान केलं. संपूर्ण तामिळनाडूच्या अनाथालय व वृद्धाश्रमांमध्ये दाम्पत्यानं अन्नदान केलं. याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियाच्या एका व्हिडिओत अनाथालयांतील मुलं आणि वृद्धाश्रमांतील वृद्ध या नवदाम्पत्याला आनंदी वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. नयनतारा व विग्नेश यांनी लग्नानंतर तामिळनाडूतील 18 हजार मुलांना व 1 लाख लोकांना दुपारचं भोजन देण्याचा संकल्प केला होता.

नयनतारा आणि विग्नेश यांची विजय सेतूपतीच्या ‘नानूम रावडी धान’ या सिनेमाच्या सेटवर भेट झाली होती. तेव्हापासूनच एकमेकांनी डेट करण्यास सुरुवात केली होती. 2021 ला साखरपुडा झाला आणि गेल्या 9 जूनला लग्न. महाबलीपूरम येथील लक्झरी रिसॉर्टमध्ये दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नात शाहरुख खान, रजनीकांत, बोनी कपूर, विजय सेतूपती, एसजे सूर्या या कलाकारांची उपस्थिती होती.

Web Title: nayanthara vignesh shivan Wedding couple offer food to the needy people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.