WikkiNayan Wedding: ‘खान साहब’ रेडी फॉर वेडिंग, नयनतारा-विग्नेशच्या लग्नात कोण कोण आले पाहुणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:09 IST2022-06-09T11:35:42+5:302022-06-09T12:09:25+5:30

Nayanthara-Vignesh Shivan Wedding: साऊथ इंडस्ट्रीचं स्टार कपल नयनतारा व विग्नेश शिवन आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या ग्रँड वेडिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाबलिपुरम येथे नयनतारा व विग्नेश यांचा लग्नसोहळा होणार आहे. लग्नविधी सुरू झाल्या आहेत.

Nayanthara-Vignesh Shivan Wedding Shah Rukh Khan reached at Nayanthara wedding: | WikkiNayan Wedding: ‘खान साहब’ रेडी फॉर वेडिंग, नयनतारा-विग्नेशच्या लग्नात कोण कोण आले पाहुणे?

WikkiNayan Wedding: ‘खान साहब’ रेडी फॉर वेडिंग, नयनतारा-विग्नेशच्या लग्नात कोण कोण आले पाहुणे?

Nayanthara-Vignesh Shivan Wedding: साऊथ इंडस्ट्रीचं स्टार कपल नयनतारा (Nayanthara) व विग्नेश शिवन (Vignesh Shivan) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या ग्रँड वेडिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाबलिपुरम येथे नयनतारा व विग्नेश यांचा लग्नसोहळा होणार आहे. लग्नविधी सुरू झाल्या आहेत. अद्याप लग्नासाठी निमंत्रित पाहुणे कोण, लग्नात काय काय विधी होणार, याबद्दलचा तपशील बाहेर आलेला नाही. पण ताज्या माहितीनुसार, महाबलिपुरम येथे एक अख्ख रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. या लग्नासाठी शाहरूख खान, रजनीकांत यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, या लग्नासाठी शाहरूख (Shah Rukh Khan)चेन्नईत पोहोचला आहे. (WikkiNayan)

अलीकडे शाहरूख कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली होती. मात्र  शाहरूख वा त्याच्या टीमने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.  नयनतारा व शाहरूख ‘जवान’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. अलीकडे या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता.

साऊथ इंडस्ट्रीचे अनेक बडे स्टार या लग्नात सहभागी होणार आहेत. कमल हासन, चिरंजीवी, सूर्या, कार्ति, विजय सेतुपती, सामंथा रूथ प्रभू असे अनेक स्टार या लग्नाला हजेरी लावणार असल्याचं कळतंय. त्यामुळे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

रिसॉर्टमध्ये 129 खोल्या...
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, नयनतारा व विग्नेश यांच्या लग्नासाठी महाबलिपुरम येथे एक लक्झरी रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. या रिसॉर्टमध्ये 129 खोल्या आहेत. संपूर्ण वीकेंडसाठी हे रिसॉर्ट बुक करण्यात आल्याचं कळतंय. याच ठिकाणी नयनतारा व विग्नेशच्या लग्नाचं रिसेप्शन होणार असल्याची महिती आहे.  

म्हणून बदललं लग्नस्थळ
नयनतारा व विग्नेश आधी तिरूपती येथे लग्न करणार होते. खुद्द विग्नेश शिवनने एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. पण नंतर हा प्लान बदलण्यात आला. कारण सर्व मित्रमंडळी व कुटुंबीयांना येथे नेणं कठीण होतं. नयनतारा व विग्नेश शिवन हे कपल गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नयनताराने विग्नेशच्या ‘नानुम राऊडीधन’ या चित्रपटात काम केलं. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी बहरली होती. दोघांनी गेल्यावर्षी साखरपुडा केला होता.

Web Title: Nayanthara-Vignesh Shivan Wedding Shah Rukh Khan reached at Nayanthara wedding:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.