नयनतारानं लग्नात नवऱ्याला दिलं 20 कोटींचं खास गिफ्ट, नणंदेलाही दिली महागडी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 12:08 PM2022-06-12T12:08:53+5:302022-06-12T12:10:50+5:30

Nayanthara Vignesh Wedding Gifts: नयन व विग्नेशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय या लग्नात विग्नेश व नयनताराने एकमेकांना दिलेल्या गिफ्टची चर्चाही जोरात आहे.

Nayanthara Vignesh Wedding nayanthara vignesh give precious gifts to each other | नयनतारानं लग्नात नवऱ्याला दिलं 20 कोटींचं खास गिफ्ट, नणंदेलाही दिली महागडी भेट

नयनतारानं लग्नात नवऱ्याला दिलं 20 कोटींचं खास गिफ्ट, नणंदेलाही दिली महागडी भेट

googlenewsNext

Nayanthara Vignesh Wedding: साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara ) हिने गेल्या 9 जून रोजी बॉयफ्रेन्ड विग्नेश शिवनसोबत (Vignesh Shivan) लग्नगाठ बांधली. तामिळनाडूच्या महाबलीपूरम येथील अलिशान रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या शाही लग्नसोहळ्याला साऊथच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानही या लग्नाला हजेरी लावली. नयन व विग्नेशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय या लग्नात विग्नेश व नयनताराने एकमेकांना दिलेल्या गिफ्टची चर्चाही जोरात आहे.

होय, चर्चा खरी मानाल तर नयनताराने पती विग्नेशला लग्नाचं एक खास गिफ्ट दिलं. तिने विग्नेशला 20 कोटी रूपयांचा एक बंगला गिफ्ट म्हणून दिला. या बंगल्याची कागदपत्र तिने आधीच तयार करून घेतले होते. लग्नाच्या दिवशी नयनताराने हा बंगला पतीला गिफ्ट दिला. इतकंच नाही तर नयनताराने आपल्या नणंदेलाही 24 तोळे सोनं भेट दिलं. 
विग्नेशने पत्नी नयनताराला 5 कोटी रूपयांची डायमंड रिंग भेट दिली. लग्नाच्या दिवशी तिने ती घातली होती. विग्नेशने पत्नी नयनताराच्या ज्वेलरीवर 2 ते 3 कोटी रूपये केलेत.

नयनतारा व विग्नेशच्या लग्नातील लुक खास होता. नयनताराने लाल रंगाची साडी परिधान केली होती. यावर तिने कुंदन आणि हिºयाची ज्वेलरी घातली होती. विग्नेशने क्रिम कलरची धोती व कुर्ता घातलला होता.

एकेकाळी नयनतारा प्रभूदेवाच्या प्रेमात होती. काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि प्रभूदेवा यांचं अफेअर मोठं चर्चिलं गेलं होतं. प्रभूदेवासाठी नयनतारा धर्म बदलण्यास तयार होती. इतकंच नाही तर प्रभूदेवानेही आपल्या पत्नी, मुलांना एकटं सोडलं होतं. मात्र, काही काळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यावर ही जोडी विभक्त झाली होती.

Web Title: Nayanthara Vignesh Wedding nayanthara vignesh give precious gifts to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.