आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत रिया चक्रवर्तीचे ड्र्ग्स कनेक्शन?, एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

By गीतांजली | Published: September 21, 2020 01:08 PM2020-09-21T13:08:45+5:302020-09-21T13:26:13+5:30

एनसीबीसमोर रियाने एक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

Ncb chief rakesh ashtana interview says rhea chakraborty drugs connection at international level | आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत रिया चक्रवर्तीचे ड्र्ग्स कनेक्शन?, एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत रिया चक्रवर्तीचे ड्र्ग्स कनेक्शन?, एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनसमोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीसमोर रियाने एक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. एनसीबी समोर रियाने बॉलिवूडमधील 25 सेलिब्रेटींची नाव सांगितली आहेत. ज्यांचा संबंध ड्रग्सशी आणि ड्रग्स तस्करीशी आहे. 

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी मुलाखतीमध्ये  अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
एनसीबी प्रमुख म्हणाले की, ड्रग्स रॅकेटशी रियाचा जवळचा संबंध आहे आणि त्यांच्या मूळपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. 


ड्रग्स रॅकेटचा आंतरराष्ट्रीय संबंध 

मुलाखतीत ते म्हणाले, रिया चक्रवर्ती ड्रग्सचा छोटा सिंडिकेट नाही आहे.त्याचे म्हणणे आहे की, या प्रकरणामुळे एक मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस आले आहे ज्याचे दुबई आणि दहशतवादी गटांशी आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रग्स रेव्ह पार्टीसाठी आणले जाते आणि या पैशांचा वापर नार्को-टेररसाठी केला जातो. 


8 लाख रुपय किलो बड्स  
राकेश अस्थाना यांच्या माहितीनुसार, क्यूरेटेड मारिजुआना बड्सची किंमत 8 लाख रुपये आहे. यानंतर ते म्हणाले, रिया चक्रवर्तीसारख्या लोकांना माफ केले जाऊ शकतं नाही. कारण ते समाजमध्ये रोल मॉडल म्हणून काम करतात, ज्यांना तरुण वर्ग फॉलो करतो. सध्या एन्जेसी यासंदर्भातले पुरावे गोळा करते आहे. 

तस्कर राहिल विश्राम अटकेत
शुक्रवारी अटक केलेला तस्कर राहिल विश्राम हा बॉलिवूडमधील या बॉसच्या सूचनेनुसार अमली पदार्थांची डिलिव्हरी करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पथकाकडून आता त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तस्कर राहिल विश्राम हा चित्रपटसृष्टीत सॅम ड्रग अंकल म्हणून ओळखला जात होता. या नावाने त्याच्याकडे मालाची मागणी केली जात असे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वसईतून चार कोटींचे कोकेन जप्त 
1एनसीबीच्या पथकाने शुक्र वारी वसई येथे छापा घालून मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त केला. त्याची किंमत चार कोटी असून याप्रकरणी एस. घंगाळेला अटक केली आहे. 2तो प्रॉपर्टी डीलर असून त्याच्याकडून अमली पदार्थाचे सेवन करीत असलेली हाय प्रोफाइल नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इथिओपियाच्या अदिस अबाबा येथून दिल्लीत आलेल्या एका पार्सलमधून ६७० ग्रॅम कोकेन जप्त केले होते. 3त्याच्या तपासाचा प्रवास वसईपर्यंत पोहोचला आहे. याबाबत कसून चौकशी करण्यात येत असल्याचे एनसीबीचे उपसंचालक (अभियान ) केपीएस मल्होत्रा यांनी शनिवारी दिल्लीत एका वृत्तसंस्थेला सांगितले.

Sushant Singh Rajput Case : एनसीबीच्या टार्गेटवर आता सॅमचा 'बॉस', बॉलीवूडमध्ये 'ड्रग अंकल' म्हणून ओळख

 

Web Title: Ncb chief rakesh ashtana interview says rhea chakraborty drugs connection at international level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.