Aryan Khan Arrest updates: ...तर किंग खानच्या मुलाला १० वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 02:25 PM2021-10-04T14:25:11+5:302021-10-04T14:25:54+5:30

Aryan Khan Arrest updates: मुंबईवरुन गोव्याच्या दिशेने रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी ( २ ऑक्टोबर) एनसीबीने (NCB) छापा टाकला.

ncb report came out in cruise drugs party case | Aryan Khan Arrest updates: ...तर किंग खानच्या मुलाला १० वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा?

Aryan Khan Arrest updates: ...तर किंग खानच्या मुलाला १० वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा?

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय राज्यघटनेमध्ये कलम ४७ अन्वये राज्याला ड्रग्स नियंत्रणासाठी अधिकार दिलेले आहेत.

मुंबईवरुन गोव्याच्या दिशेने रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी ( २ ऑक्टोबर) एनसीबीने (NCB) छापा टाकला. या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानदेखील सहभागी आहे. त्यामुळे आर्यन सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. एनसीबीने आर्यनसह अन्य जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमांपैकी २०(बी) या कलमात १० वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. त्यामुळे आर्यनवरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला १० वर्षांचा कारावास होऊ शकतो.

१० वर्ष शिक्षेची तरतूद

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सगळ्यांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गंत (एनडीपीएस अॅक्ट) कलम २० बी, ८(सी)२७ आणि ३५ सह अन्य कलम लावण्यात आले आहेत. २० (बी)   कलमांतर्गंत जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो किंवा दिलेल्या नियमांचे वा अटींचे पालन करत नाही. थोडक्यात, मादक पदार्थांची आंतरराज्यीय आयात- निर्यात केल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

क्रूझ ड्रग्स पार्टी: प्रत्येक व्यक्तीकडून स्वीकारण्यात आलेलं तब्बल इतकं शुल्क

आर्यनला होऊ शकते १ वर्षापर्यंत शिक्षा?

आर्यनवर केवळ एनडीपीएसच्या कलम २७ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला २० हजार रुपये दंड आणि १ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असं एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

अरबाज मर्चेंटकडे सापडला चरस

आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्या बुटांमध्ये चरस लपवल्याचं निदर्शनास आलं आहे.

Mumbai Cruise Drugs Bust: आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुख खान घेतोय 'या' वकिलाची मदत

आज होणार सुनावणी

मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणी आज दुपारी २.३० वाजता न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

ड्रग्सबाबत भारतात काय आहे धोरण 

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम ४७ अन्वये राज्याला ड्रग्स नियंत्रणासाठी अधिकार दिलेले आहेत. ड्रग्स नियंत्रणांतर्गत ३ श्रेणींमध्ये ड्रग्सची चर्चा सध्याच्या कायद्यामध्ये आहे. १ - एलएसडी, मॅथसारखे सायकोट्रॉपिक पदार्थ, २- चरस, गांजा, अफीमसारखे नारकोटिक्स पदार्थ, ३- मादक पदार्थांचे केमिकल मिश्रित पदार्थ, ज्यांना कंट्रोल सब्सटेंट म्हणतात. या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झाल्यास किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
 

Web Title: ncb report came out in cruise drugs party case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.