महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन नीना गुप्ता-संजय मिश्रांनी केली 'या' आगामी सिनेमाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:45 IST2025-02-07T17:44:48+5:302025-02-07T17:45:32+5:30
नीना गुप्ता - संजय मिश्रा यांनी महाकुंभमेळ्यात जाऊन त्यानिमित्ताने त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केलीय (neena gupta, sanjay mishra)

महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन नीना गुप्ता-संजय मिश्रांनी केली 'या' आगामी सिनेमाची घोषणा
नीना गुप्ता (neena gupta) आणि संजय मिश्रा (sanjay mishra) बॉलिवूडमधील चर्चेतले कलाकार. दोघांच्या सिनेमांचा स्वतःचा एक प्रेक्षकवर्ग आहे. व्यावयासिक आणि कलात्मक सिनेमे करण्यात दोघांचाही हातखंडा आहे. नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांनी नुकतीच प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला (mahakumbhmela) हजेरी लावली. इतकंच नव्हे, महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन नीना-संजय यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणाही केली. हा सिनेमा त्यांच्याच गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल आहे.
नीना - संजय यांची महाकुंभमेळ्याला खास घोषणा
नीना गुप्ता - संजय मिश्रा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. या दोघांची भूमिका असलेला 'वध' सिनेमा २०२२ साली आला. दोघांच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. आता याच सिनेमाचा सीक्वल येणार आहे. महाकुंभमेळ्याच्या पवित्र वातावरणात 'वध २'चे निर्माते आणि सिनेमाच्या इतर टीमच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. २०२२ साली आलेला 'वध' सिनेमा चांगलाच गाजला. नीना-संजय यांच्या अभिनयाचंही चांगलंच कौतुक झालं. आता 'वध २'मध्ये ही जोडी प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करणार आहे.
'वध २' विषयी
जसपाल सिंग संधू 'वध २'चं दिग्दर्शन करणार आहेत. लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहेत. पुन्हा एकदा 'वध २'मध्ये नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. अत्यंत संवेदनशील कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय अशा गोष्टींमुळे 'वध' सिनेमा चांगलाच गाजला. अजूनही हा सिनेमा ओटीटीवर चर्चेत आहे. त्यामुळे महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन नीना-संजय या कसलेल्या कलाकारांनी 'वध २'ची घोषणा केली.