दोन वर्षांतच मोडलेला मसाबा गुप्ताचा संसार, लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत:ला दोषी ठरवतात नीना गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 05:36 PM2023-09-01T17:36:14+5:302023-09-01T17:38:44+5:30

लेकीच्या घटस्फोटासाठी नीना गुप्ता स्वत:ला दोषी मानत असल्याचा खुलासा मसाबाने मुलाखतीत केला आहे.

neena gupta blame herself for daughter divorced masaba gupta revealed she refused her live in relationship | दोन वर्षांतच मोडलेला मसाबा गुप्ताचा संसार, लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत:ला दोषी ठरवतात नीना गुप्ता

दोन वर्षांतच मोडलेला मसाबा गुप्ताचा संसार, लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत:ला दोषी ठरवतात नीना गुप्ता

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मसाबाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्न, घटस्फोट याबाबत भाष्य केलं. यावेळी मसाबाने अनेक गोष्टींचा खुलासाही केला. लेकीच्या घटस्फोटासाठी नीना गुप्ता स्वत:ला दोषी मानत असल्याचंही मसाबाने या मुलाखतीत सांगितलं. 

मसाबाने नुकतीच ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत पूर्वाश्रमीचा पती मधु मंटेनाबाबतही भाष्य केलं. ती म्हणाली, "मी लवकर लग्न करावं असं माझ्या आईला वाटत होतं. माझ्या घटस्फोटानंतर तिला धक्का बसला होता. आम्ही वेगळे होत आहोत, यावर तिला विश्वास बसत नव्हता. तुमच्या लग्नाला दोनच वर्ष झाली आहेत. तुम्ही जास्त वेळही एकत्र घालवलेला नाही. आता कुठे तुमच्या नात्याला सुरुवात झाली होती. लगेच सगळं संपलं, असं ती म्हणायची." 

रस्त्यावरच्या नळावर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध टीव्ही अभिनेता, व्हिडिओ व्हायरल

"मला लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. पण, माझ्या आईचा या गोष्टीला विरोध होता. जेव्हा तिला आमच्या नात्याबद्दल कळलं, तेव्हा तिने लगेचच माझं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. तिने दुसऱ्याच दिवशी माझं कोर्ट मॅरेज केलं. लग्न केलं नाहीतर कोणीही कधीही सोडून जाऊ शकतं, असं तिला वाटत होतं. माझ्या आईने केलेली चूक मी करू नये, अशी तिची इच्छा होती. म्हणूनच तिने माझं लग्न लवकर लावून देण्याचा निर्णय घेतला होता," असंही मसाबाने सांगितलं. 

शाहरुख खानच्या 'जवान'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; एका तिकिटासाठी मोजावे लागणार 'इतके' हजार रुपये

मसाबाच्या घटस्फोटासाठी नीना गुप्ता स्वत:ला दोषी मानतात. याबाबत ती म्हणाली, "माझा घटस्फोट झाल्यानंतर ती खूप दु:खी झाली होती. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. यात माझी चूक आहे. मी तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास परवानगी द्यायला हवी होती. मी खूप वाईट आहे आहे, असं ती म्हणाली होती." मसाबा ही नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड यांची लेक आहे. घटस्फोटानंतर मसाबाने सत्यदीप मिश्राबरोबर दुसरं लग्न करत पुन्हा संसार थाटला आहे. 
 

Web Title: neena gupta blame herself for daughter divorced masaba gupta revealed she refused her live in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.