वयाचे तरी भान ठेवायला पाहिजे होते, नीना गुप्ता गुलजार यांच्या भेटीनंतर झाल्या ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 03:55 PM2021-06-26T15:55:22+5:302021-06-26T16:00:29+5:30
गेल्या काही दिवसांपासून नीना गुप्ता प्रचंड चर्चेत आहेत. नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र 'सच कहुँ तो' मुळे त्या जास्त चर्चेत आहेत.
नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत नात्यात होत्या त्यांनी लग्न केले नाही. दोघांना एक मुलगी असून मसाबा तिचे नाव आहे. मुलीचा सांभाळ एकट्या नीना यांनी केला आहे.नीना या लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्या होत्या. याविषयी त्या मनमोकळेपणाणे अनेकदा मुलाखतीतमध्येही बोलताना दिसतात. खरंतर नीना गुप्ता जेव्हा लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्या तो काळ असा होता की, अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण फारच वेगळा होता. आता काळ बदलला आहे. अनेकदा नीना त्यांच्या रिलेशनशिपला घेवून आपले मतं मांडताना दिसतात. इतकेच नाही तर नीना गुप्ता यांनी वयाच्या पन्नाशीत लग्न केले आहे. विवेक मेहरासोबत त्यांनी लग्न करत नव्याने संसार थाटला.
गेल्या काही दिवसांपासून नीना गुप्ता प्रचंड चर्चेत आहेत. नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र 'सच कहुँ तो' मुळे त्या जास्त चर्चेत आहेत. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी खासगी आयुष्यात घडलेल्या सगळ्याच गोष्टींचा उलगडा केला होता.
नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र वाचून अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सगळ्या सेलिब्रेटींचे अभिप्राय जाणून घेतल्यानंतर गुलजार साहेबांनीही हे आत्मचरित्र वाचावे आणि त्यांचे मत जाणून घेण्याची नीना गुप्ता यांची ईच्छा होती. म्हणून त्यांनी त्यांचे आत्मचरित्र भेट देण्यासाठी गुलजार यांची भेट घेतली होती. आत्मचरित्र गुलजार साहेब वाचून त्यांचेही याविषयी मत कळणार यामुळे नीना गुप्ता प्रचंड आनंदित होत्या. त्यांच्या या ग्रेट भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
गुलजार साहेबांसह नीना गुप्ता यांचे फोटो पाहून चाहत्यांचा चांगला संताप झाला. फोटोंवर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. सोशल मीडियावर नीना गुप्ता प्रचंड ट्रोल होत आहेत. नीना गुप्ता गुलजार साहेबांना भेटायला गेल्या तेव्हा त्यांनी शॉर्ट्स परिधान केले होते. नीना गुप्ता यांनी गुलजार यांना भेटायला जाताना तरी साडी किंवा भारतीय पोशाखात जायले हवे होते. नीना गुप्ता यांचे असे वागणं अशोभणीय असल्याचे चाहते म्हणत आहे. तर काहींनी आपल्या वयाचे तरी भान राखायला हवे होते. शोभतील असे कपडे परिधान करायला हवे होते. अशा कमेंट्स करत नीना गुप्ता यांच्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.