नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ताचे ‘ट्रायल सेपरेशन’ फसले! आता घेणार घटस्फोट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 13:45 IST2019-03-15T13:44:12+5:302019-03-15T13:45:01+5:30
दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची लेक मसाबा गुप्ता ही गतवर्षी ऑगस्टमध्ये पतीपासून विभक्त झाली होती. आता मसाबाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे कळतेय.

नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ताचे ‘ट्रायल सेपरेशन’ फसले! आता घेणार घटस्फोट!!
दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची लेक मसाबा गुप्ता ही गतवर्षी ऑगस्टमध्ये पतीपासून विभक्त झाली होती. आता मसाबाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे कळतेय.
मसाबाचा पती मधु मंटेना एक निर्माता आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात मसाबाने एक अधिकृत निवेदन जारी करून पतीपासून विभक्त होत असल्याचा निर्णय जाहिर केला होता. अर्थात हे एक ‘ट्रायल सेपरेशन’ होते.
‘मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून अनेक विचारांती आम्ही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वत:ला खासगी आयुष्यात काय हवे, यामुळे अनावश्यकरित्या आमच्या लग्नावर व प्रेमावर दबाव जाणवत होता. त्यामुळे आम्ही ट्रायल सेपरेशन घेण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही काही काळ या लग्नापासून दूर राहू आणि आम्हाला आयुष्यात काय हवे, हे समजून घेऊ. हा आमच्यासाठी कठीण निर्णय आहे. आमच्या खासगीपणाचा आदर केला जावा, ही अपेक्षा’, असे मसाबाने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले होते. ‘ट्रायल सेपरेशन’च्या या निर्णयानंतर सात महिन्यांनी मसाबाने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे कळतेय. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मसाबाने सन २०१५ मध्ये मंटेनासोबत लग्न केले होते. बॉलिवूडची प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवयन यांचे लग्न झालेले नाही. मसाबाचा पती मधू फँटम फिल्म्सचा को-फाउंडर आहेत. त्याने गजनी, रण, रक्त चरित्र, झुठा ही सही, मौसम या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मसाबाचे म्हणाल तर ती बॉलिवूडची एक यशस्वी फॅशन डिझाईनर आहे.