'मी त्याचा द्वेष...', EX बॉयफ्रेंड व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबाबत नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:01 PM2022-08-08T13:01:56+5:302022-08-08T13:13:15+5:30

नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स रिचर्ड्स एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी नीना प्रेग्रेंट राहिल्या होत्या. व्हिव्हियन यांनी लग्न करण्यास नकार दिला होता. सिंगल मदर म्हणून नीना यांनी मुलगी मसाबाची काळजी घेतली.

Neena Gupta reveals her equation with Vivian Richards said she does not hate him | 'मी त्याचा द्वेष...', EX बॉयफ्रेंड व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबाबत नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

'मी त्याचा द्वेष...', EX बॉयफ्रेंड व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबाबत नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta) सध्या खूप चर्चेत आहेत. प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीदेथील बेधडकपणे व्यक्त होत असतात. नीना सुरूवातीपासून अगदी स्वत:च्या अटींवर जगल्या. आजही त्या तसंच जगत आहेत. ज्या मुद्यावर अनेक कलाकार बोलायला घाबरतात, त्या मुद्यावर नीना अगदी बिनधास्त बोलतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने वेस्ट इंडिजचे  क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स रिचर्ड्ससोबतच्या तिच्या नात्याबद्दल मौन सोडले आहे. 

एक्स बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाल्या?
नीना गुप्ता(Neena Gupta)म्हणाल्या, 'माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही एखाद्यावर एकदा प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार कसा करू शकते? तुम्ही जगू शकत नाही, तुम्ही एकत्र राहू शकत नाही. मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा तिरस्कार करत नाही. मी त्याचा  द्वेष का करु, जर एखादी व्यक्ती मला आवडत नसेल तर मी त्याच्या मुलाला जन्म कसा देऊ शकते? मी वेडी आहे का?'

नीना गुप्ता यांचे क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स रिचर्ड्सबरोबर संबंध होते हे तर जगजाहीर आहे. त्यावेळी नीना गर्भवती राहिल्या होत्या. विव्हियन यांनी नीनाशी लग्न केले नसले, तरी नीना यांनी लग्न न करता बाळाला या जगात आणण्याचे ठरवले होते. मुलीला जन्म दिला, तिच मुलगी मसाबा आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध चेहरा बनली आहे. लग्न न करताच मुलीला जन्म दिल्यामुळे नीना गुप्ताचे कुटुंब त्यांच्यावर नाराज होते. तर  व्हिव्हियन रिचर्डसही त्यांच्या पत्नीपासून वेगळेच राहत होते. सिंगल मदर बनत एकटीनेच मुलगी मसाबाची काळजी घेतली. नंतर नीना यांनी 2008मध्ये विवेक मेहराशी लग्न केले आणि दोघांचा सुखाने संसार सुरु आहे.

Web Title: Neena Gupta reveals her equation with Vivian Richards said she does not hate him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.