‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा किस्सा! सुभाष घईंची ‘डिमांड’ ऐकून नीना गुप्तांची अशी झाली होती अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 01:36 PM2021-06-17T13:36:01+5:302021-06-17T13:36:27+5:30

‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात नीना यांनी व्यक्तिगत आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याबद्दलचा खुलासा त्यातलाच एक.

Neena Gupta Reveals Subhash Ghai Demanded Her To Wear A Padded Bra During Shoot | ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा किस्सा! सुभाष घईंची ‘डिमांड’ ऐकून नीना गुप्तांची अशी झाली होती अवस्था

‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा किस्सा! सुभाष घईंची ‘डिमांड’ ऐकून नीना गुप्तांची अशी झाली होती अवस्था

googlenewsNext
ठळक मुद्दे नीनांनी आपल्या आत्मचरित्रात ‘चोली के पीछे क्या है’ असे एक चॅप्टरच लिहिले आहे.

1993 साली प्रदर्शित झालेला ‘खलनायक’ (Khal Nayak ) हा सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवते ते या सिनेमातील ‘चोली के पीछे क्या है’ (Choli Ke Peeche Kya Hai) हे गाणं. या गाण्यामुळे  ‘खलनायक’ वादात सापडला होता. हे गाणं अश्लिल असल्याचा आरोप करत यावरून चांगलाच राडा झाला होता. अगदी काही लोकांनी रस्त्यावर उतरत सिनेमाच्या ऑडिओ कॅसेट्स जाळल्या होत्या. या गाण्यामुळे नीना गुप्ता, माधुरी दीक्षित आणि ईला अरूण यांनाही टीका सहन करावी लागली होती. आता नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी आपल्या आत्मचरित्रात या गाण्याच्या शूटींगसंदर्भातला एक खुलासा केला आहे. 

‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात नीना यांनी व्यक्तिगत आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याबद्दलचा खुलासा त्यातलाच एक. नीनांनी आपल्या आत्मचरित्रात ‘चोली के पीछे क्या है’ असे एक चॅप्टरच लिहिले आहे.

नीना लिहितात...
‘चोली के पीछे क्या है’ मी पहिल्यांदा ऐकले तेव्हाच हे एक कॅची सॉन्ग असल्याचे मला कळले होते.  या गाण्यात माझी काय भूमिका आहे, हे जेव्हा सुभाष घई यांनी मला सांगितले, तेव्हा मी हे गाणे करताना थोडी नर्व्हस होते. गाण्यासाठी मला गुजराती आदिवासी कपडे घालायला दिले गेले आणि हे कपडे घालून अप्रूव्हलसाठी सुभाष घई (Subhash Ghai) यांच्याकडे पाठवले. मी कपडे घालून त्यांच्यासमोर उभी झाले आणि मला पाहताच, सुभाष घई नो! नो.. नो! कुछ भरो, असे म्हणत ओरडू लागले. मी जागच्या जागी शरमेने जणू गोठली.

माझ्या मते, ते माझ्या ब्लाऊजबद्दल बोलत होते. ते व्यक्तिश: मला बोलत नव्हते, त्यांनी व्हिज्युअलाईज केले होते आणि त्यांना तेच अपेक्षित होते, हे मला ठाऊक होते. पण मी त्या दिवशी शूटींग केले नाही. दुस-या दिवशी मी सेटवर पोहोचले तेव्हा मला एक हेवी पॅडेड ब्रा दिली गेली होती. मी पुन्हा कपडे घालून सुभाष घई यांच्यासमोर गेले आणि मला ते समाधानी दिसले. सुभाष घई यांना जे हवे असायचे त्यासाठी ते खास सूचना द्यायचे. कदाचित हेच कारण आहे की ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत...

Web Title: Neena Gupta Reveals Subhash Ghai Demanded Her To Wear A Padded Bra During Shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.