वयाच्या पन्नाशीत नीना गुप्ताने केले लग्न, पतीसह असलेल्या नात्याविषयी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 03:41 PM2020-09-29T15:41:36+5:302020-09-29T15:46:11+5:30
नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत नात्यात होत्या त्यांनी लग्न केले नाही. दोघांना एक मुलगी असून मसाबा तिचे नाव आहे.
अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच बिनधास्त आणि रोखठोक पद्धतीने खाजगी आयुष्याविषयी चर्चा करताना दिसते. नुकतेच नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर' शोमध्ये तिने हजेरी लावली होती. तेव्हा नीनाने पती विवेक मेहरासोबतच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. वयाच्या ५० व्या वर्षी नीना गुप्ता विवेक मेहरासोबत लग्नबंधनात अडकल्या आहेत. याविषयी बोलताना त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. 'आम्ही पहिल्यांदा दोघे विमानातच भेटलो. आम्ही दोघे लंडनला जात होतो.तो दिल्लीत राहत होता, परंतु काही कामामुळे तो मुंबईला आला होता. अचानक एका महिलेला तिची जागा बदलून हवी होती, तेव्हा विवेकने त्या महिलेला आपली जागा दिली आणि नंतर तो माझ्या शेजारी येऊन बसला.
नीना पुढे सांगितले 'तो नेहमीच मला चिडवायचा. की तूच आहेस, तू मला फसवलेस. आता मी गोष्टीवरून त्याच्याशी भांडत नाही. पूर्वी मी भांडायचे. आता मी उलट त्याला बोलते. बरं फसवले मी तुला, आता पुढे काय, माझ्याबरोबर खुश नसशील तर तू मला सोडून स्वतंत्र राहू शकतो. तुला कशाला अडकवून ठेवू. आता तो मस्करीतही मला तसे काही बोलत नाही. विवेकबरोबर राहताना साईन लँग्वेजमध्ये कसे बोलले जाते हे मी शिकले, कारण तो बहुतेक वेळा कॉन्फरन्समध्ये असतो. त्यावेळी मग असेच साईन लँग्वेजमध्ये त्याच्याशी बोलावे लागते.
माझ्या पतीला माझी मुलगी नको असती तर मी कधीच लग्न केले नसते.
नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत नात्यात होत्या त्यांनी लग्न केले नाही. दोघांना एक मुलगी असून मसाबा तिचे नाव आहे. मुलीचा सांभाळ एकट्या नीना यांनी केला आहे.यापूर्वीही अनेकदा मुलाखती दरम्यान नीना यांनी सांगितले आहे की, 'जर होणा-या पतीला माझी मुलगी मसाबा आवडत नसेल किंवा मसाबाला तो व्यक्ती आवडत नसेल तर त्याच्याशी मी कधीच लग्न करणार नाही असे आधीच ठरवले होते.अशा परिस्थितीत लग्न करण्यात आणि प्रेम करण्यात काही अर्थ नाही.
ज्याला माझ्या मुलीपासून प्रॉब्लेम असेल त्याच्याशी संबंध ठेवण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी ज्या व्यक्तीची माझा पती म्हणून निवड केली आहे. त्यालाही माझ्या मुलीला पसंत करणे महत्त्वाचे आहे असे मी मानते. कारण 'प्रत्येक मुलांना दोन्ही पालकांची गरज असते. मी नेहमीच मसाबाशी प्रामाणिक राहिले आहे जेणेकरून आमच्या नात्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही, परंतु मला माहित आहे की तिलाही खूप त्रास सहन करावा लागला आहे. '