Neena Gupta Video : "मुंबईत आल्यावर कोणी ओळखणार नाही" भर उन्हात शूट करताना नीना गुप्ता हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 09:58 AM2023-05-24T09:58:31+5:302023-05-24T10:00:07+5:30

'पंचायत 3' च्या शूटिंगची झलक नीना गुप्ता यांनी दाखवली आहे.

neena gupta shared video of shooting panchayat series in hot temperature says no one will recognise us after coming back to mumbai | Neena Gupta Video : "मुंबईत आल्यावर कोणी ओळखणार नाही" भर उन्हात शूट करताना नीना गुप्ता हैराण

Neena Gupta Video : "मुंबईत आल्यावर कोणी ओळखणार नाही" भर उन्हात शूट करताना नीना गुप्ता हैराण

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय वेबसिरीज म्हणजे 'पंचायत' (Panchayat). साधी गावाकडची कथा असणारी ही वेबसिरीज प्रेक्षकांचं मन जिंकते. आतापर्यंत सिरीजचे २ सिझन रिलीज झाले आहेत. तर आता सिझन 3 च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिझनसाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

'पंचायत' सिरीजचं शूट मध्य प्रदेशमधील एका गावात रिअर लोकेशनवर केलं जातं. त्यामुळे सध्याच्या कडक उन्हातही ही टीम काम करत आहे. याची झलक अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी दाखवली आहे. त्यांनी सिरीजमध्ये मंजू देवी ही गावातील सरपंचाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. ४० डिग्री तापमानात चित्रीकरण करत असताना त्यांचे वाईट हाल झाले असल्याचं त्या व्हिडिओत सांगत आहेत. त्या म्हणतात, "खूप ऊन आहे. छत्री काढली तर डोळ्यांना चेहऱ्याला उन्हाचा तडाखा बसतोय. अगदी लाही लाही  होत आहे. जेव्हा मी मुंबईत येईल तेव्हा आम्हाला कोणी ओळखणारंही नाही. पण ठिके हरकत नाही अभिनय करायचा आहे तर ..." असं म्हणून त्या हसतात.

नीना गुप्ता यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "नीनाजी, प्रोडक्शनवाल्यांना मिट स्प्रेसोबतच फॅन्स लावायला सांगला. मॉइश्चरमुळे डिहायड्रेशन कमी होईल." तर दुसरा चाहता म्हणतो, "मॅडम प्लीज एवढं सहन करा, पंचायत ३ ची प्रतिक्षा आहे."

'पंचायत' या वेबसिरीजमधील प्रत्येक पात्र मनात घर करुन आहे. प्रधान असो किंवा विनोद, बनराकरस. या सिरीजने प्रत्येकालाच हसवलं आणि सोबतच वेळोवेळी महत्वाचे संदेशही दिले. आता चाहत्यांची तिसऱ्या भागाची उत्सुकता ताणली आहे.

Web Title: neena gupta shared video of shooting panchayat series in hot temperature says no one will recognise us after coming back to mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.